Maharashtra Election, Maharashtra CM: Ramdas Athvale re-appeals to Shiv Sena; Self If you want to fulfill Balasaheb Thackeray;s dream ... | Maharashtra CM: आठवलेंचे शिवसेनेला पुन्हा आवाहन; स्व. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर...
Maharashtra CM: आठवलेंचे शिवसेनेला पुन्हा आवाहन; स्व. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर...

नवी दिल्ली - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिवसेनेने काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापन न करता भाजपसोबत सरकार स्थापन करावे. असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या 7 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना रामदास आठवले यांनी अभिवादन केले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत उपराष्ट्रपती बोलावलेल्या बैठकीस तसेच सर्व पक्षीय बैठकीस उपस्थित राहण्यास रामदास आठवले दिल्लीत असल्यामुळे त्यांना मुंबईत शिवाजी पार्क येथे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शक्तीस्थळ स्मारकास आज भेट देता आली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी शिवसेना स्थापन केली. देशभर शिवसेना वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते अत्यंत डॅशिंग आक्रमक नेते आणि वक्ते होते. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवरुन हटविण्यासाठी शिवशक्ती भिमशक्तीची एकजूट उभारली. शिवशक्ती भीमशक्ती ऐक्याचे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या रिपब्लिकन पक्षाने त्यांना साथ दिली. 

शिवशक्ती भीमशक्तीमुळे राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना भाजप महायुतीचे सरकार आले. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करण्यापेक्षा भाजपसोबत एकत्र येवून राज्यात सरकार स्थापन करावे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडून द्यावा आणि उपमुख्यमंत्री पद घेवून एकत्र सरकार चालवावे. मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेचा फार आग्रह असल्यास भाजपने दीड वर्षासाठी मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देऊन तडजोड करावी असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

दिल्लीत रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून शिवसेना भाजप यांना एकत्र आणून सरकार बनविण्याबाबत विषय मांडला असता त्यांनी सर्व सुव्यवस्थित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची नवी दिल्लीत रामदास आठवले यांची भेट घेवून शिवसेना भाजपने एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. शिवसेना भाजपमधील दुरावा संपवून त्यांना एकत्र आणण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्लीत मध्यस्थी करण्याचा आज प्रयत्न केला. 
 

Web Title: Maharashtra Election, Maharashtra CM: Ramdas Athvale re-appeals to Shiv Sena; Self If you want to fulfill Balasaheb Thackeray;s dream ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.