शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

निराधार, गरिबांना घरे देण्यात महाराष्ट्र पुढे

By admin | Updated: March 2, 2017 05:50 IST

निराधार आणि गरिबांना निवारा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र राज्य देशात चार राज्यांत पहिल्या स्थानावर आहे.

हरिश गुप्ता,नवी दिल्ली- निराधार आणि गरिबांना निवारा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र राज्य देशात चार राज्यांत पहिल्या स्थानावर आहे. पश्चिम बंगालने जास्तीतजास्त गरिबांना घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आघाडी घेतली असून, महाराष्ट्र, गुजरात आणि तमिळनाडूनेही यात चांगले काम केले आहे.प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात शहरी निराधारांसाठी किती निवारे उपलब्ध आहेत याची प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीचे अध्यक्ष दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. कैलाश गंभीर असून, समिती आपला अहवाल पुढील महिन्यात सादर करील. हे निवारे नॅशनल अर्बन लाईव्हलीहुड मिशनअंतर्गत (एनयूएलएम) मार्गदर्शक निकषांनुसार असल्याची खातरजमा ही समिती करील. तसेच निवारा घरे बांधण्याचा वेग कमी का, याची कारणे विचारणार आहे. या योजनेसाठी मंजूर झालेल्या निधीचा वापर न होणे, तो दुसऱ्या कामाकडे वळवणे किंवा त्याचा चुकीचा वापर करणे याचाही जाब समिती विचारेल.पश्चिम बंगाल अव्वल स्थानी जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिनिव्हल मिशन आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (नागरी) महाराष्ट्राला जवळपास तीन लाख घरे मंजूर झाली आहेत. एक लाख ३७ हजार २७५ घरांचे बांधकाम आधीच झालेले असून, गरीब कुटुंबांना ९८ हजार ६२ घरांचा ताबा दिला गेला आहे. तथापि, पश्चिम बंगालने त्याला मंजूर झालेल्या कोट्यापैकी ५० टक्के घरे बांधून पूर्ण केली आहेत आणि त्या सर्वांचा लाभार्थी गरिबांना दिला गेला आहे. पश्चिम बंगाल चार राज्यांत पहिल्या क्रमांकावर आहे.>137275 घरांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.- 98062 कुटुंबांना घरांचा ताबा दिला- 62514 घरांचे बांधकाम अद्याप बाकी- 297851 घरे महाराष्ट्रासाठी मंजूर झालेली आहेत