'वक्फ जमिनीवर महाकुंभाचे आयोजन, पण...', मौलाना रझवी यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 14:35 IST2025-01-05T14:34:32+5:302025-01-05T14:35:03+5:30
UP News: ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी महाकुंभाबाबत मोठा दावा केला आहे.

'वक्फ जमिनीवर महाकुंभाचे आयोजन, पण...', मौलाना रझवी यांचा दावा
UP Mahakumbh : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभात मुस्लिमांना प्रवेश नाकारल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या वादावर आतापर्यंत राज्यातील सर्व नेत्यांपासून ते साधू-सतांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आता या वादात ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांचे मोठे वक्तव्य आले आहे. महाकुंभ आयोजन वक्फ जमिनीवर करण्यात आले आहे, पण आम्ही त्याला विरोध करणार नाहीत. आता त्यांनीही मोठे मन दाखवावे, असे रजवी म्हणाले.
Kumbh Mela की जहां तैयारियां की जा रही है वो जमीन 54 विघह वक्फ की है, मुसलमानो ने बडा दिल दिखाते हुए कोई आपत्ती नही की मगर दूसरी तरफ अखाड़ा परिषद और दूसरे बाबा लोग मुसलमानो के प्रवेश पर पाबंदी लगा रहे है। ये तंग नजरी छोड़नी होगी, मुसलमानो की तरह बड़ा दिल दिखाना होगा। #KumbhMelapic.twitter.com/5zxzKKhdXu
— Maulana Shahabuddin Razvi Bareilvi (@Shahabuddinbrly) January 5, 2025
ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी X वर एक व्हिडिओ शेअर करुन महाकुंभबाबत हा दावा केला आहे. शहाबुद्दीन म्हणाले की, मुस्लिमांनी नेहमीच मोठे मन दाखवले, त्याची अनेक उदाहरणे सापडतील. महाकुंभाच्या आयोजनाबाबत मौलाना शहाबुद्दीन रझवी म्हणाले की, महाकुंभाची तयारी सुरू असलेली जमीन वक्फची आहे. पण, मुस्लिमांनी मोठे मन दाखवून कोणताही आक्षेप घेतला नाही. दुसरीकडे आखाडा परिषद आणि इतर बाबालोक मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालत आहेत. आपल्याला हा संकुचित दृष्टिकोन सोडून मुस्लिमांसारखे मोठे मन ठेवावे लागेल.
मुस्लिमांच्या प्रवेशावर बंधी
4 नोव्हेंबर रोजी प्रयागराज येथे भारतीय आखाडा परिषदेची बैठक झाली होती. या बैठकीत महाकुंभमेळ्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्यावा, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कुंभमेळ्यात चुकीच्या पद्धतीने प्रवेश करुन सनातन संस्कृती आणि परंपरा दूषित करू शकते. या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी निष्पक्ष प्रशासन आणि सरकारला वेळीच सतर्क राहावे लागेल, असे बैठकीत म्हटले गेले. आखाडा परिषदेच्या या निर्णयाला हिंदू धर्मगुरूंनी पाठिंबा दिला. यानंतर महाकुंभात मुस्लिमांच्या प्रवेशाबाबत सातत्याने वाद सुरू आहे.