"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 23:07 IST2025-11-19T23:02:51+5:302025-11-19T23:07:49+5:30
जवानाचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीचे तिच्या भाऊजीसोबतच (बहिणीचा पती) अनैतिक संबंध आहेत. तसेच, आपली अवस्थाही इंदूरच्या 'राजा रघुवंशी' सारखी होऊ नये, अशी भीतीही त्याला सतावू लागली आहे. देवेंद्र सिंह राजावत असे या जवानाचे नाव आहे. त्याने पत्नीपासून संरक्षण मिळावे यासाठी, ग्वाल्हेर पोलिसांत धाव घेतली आहे...

"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कायादक प्रकार समोर आला आहे. देशाच्या सीमेवर 'ऑपरेशन सिंदूर'सारख्या मोहिमेत पाकिस्तानला धडा शिकवणारा भारतीय लष्कराचा जवान आता आपल्याच पत्नीच्या जाचामुळे त्रस्त झाला आहे. जवानाचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीचे तिच्या भाऊजीसोबतच (बहिणीचा पती) अनैतिक संबंध आहेत. तसेच, आपली अवस्थाही इंदूरच्या 'राजा रघुवंशी' सारखी होऊ नये, अशी भीतीही त्याला सतावू लागली आहे. देवेंद्र सिंह राजावत असे या जवानाचे नाव आहे. त्याने पत्नीपासून संरक्षण मिळावे यासाठी, ग्वाल्हेर पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनीही देवेंद्र यांच्या तक्रारीवर प्रकरणाची चौकशी करण्याचा विश्वास दिला आहे.
गोला का मंदिर परिसरात राहणाऱ्या देवेंद्र सिंह राजावत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २५ एप्रिल २०२५ रोजी त्यांचे औरैया येथील वंदना चौहान हिच्याशी लग्न झाले. वंदना मुरैना येथील सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे. वंदनाने आपली प्रॉपर्टी हडपण्याच्या उद्देशाने आपल्याशी लग्न केले, असा आरोप जवान देवेंद्र सिंह यांनी केला आहे.
लग्नाच्या पहिल्या रात्री काय घडलं? -
देवेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या पहिल्या रात्री वंदनाने त्यांना संपत्तीसंदर्भात विचारणा केली. यावर सर्व काही आईच्या नावावर असल्याचे देवेंद्र यांनी तिला सांगितले. यावर ती रागावली आणि तिने शारीरिक संबंधास नकार दिला. एवढेच नाही तर, लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच वंदनाचे तिच्या बहिणीच्या पतीसोबत (भाऊजी) म्हणजेच 'कमल किशो'सोबत अनैतिक संबंध असल्याचे देवेंद्र यांना समजले. यानंतर, २९ एप्रिल रोजी तिच्या बहिणीने (अंजना) विष घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, वंदनाने भाऊजीकडे जाण्याचा आग्रह धरला, तेव्हा देवेंद्र यांनी तिला अडवले. यावर तिने आपल्या माहेरच्यांकडे देवेंद्रने आपल्याला मार-हाण केल्याची तक्रार केली. यानंतर तिच्या माहेरच्यांनी देवेंद्र यांना मारहाण केली. यानंतर पंचायत होऊन सर्व सत्य समोर आल्यानंतर त्यांनी देवेंद्र यांची माफीही मागितली.
देवेंद्र यांना 'ऑपरेशन सिंदूर'च्या ड्यूटीचा इमर्जन्सी कॉल -
देवेंद्र यांना ९ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर'च्या ड्यूटीचा इमर्जन्सी कॉल आल्यामुळे कर्तव्यावर जावे लागले. १७ मे रोजी परत आल्यावर वंदना दागिने घेऊन मुरैना येथे गेल्याचे समजले. मुरैना येथील रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता ती १५ दिवसांची सुट्टी घेऊन आग्र्याला गेल्याचे समजले. यानंतर त्यांनी वंदनाला फोन लावला असता, तिने त्यांनाच धमकावले. यानंतर वंदनाच्या भाऊजीचा कमल किशोरचा देवेंद्र यांना अनेकवेळा फोन आला आणि तो धमक्या देत होता. याशिवाय, वंदनानेही त्यांना फोन करून खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत पन्नास लाख रुपयांची मागणी केली.
जवान देवेंद्र यांच्या तक्रीरीवरून, पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.