शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून भाजपत का आले? जेपी नड्डांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 5:28 PM

नड्डा म्हणाले, दीड वर्षे आपण पाहिले आहे, की काँग्रेस सरकार कसे चालते. दीड वर्षे दक्षिणा आणि ट्रान्सफर वाले सरकार आले होते. या दीड वर्षातच, अंधःकार आणि प्रकाशात काय फरक असतो? अमावस्या आणि पौर्णिमेत काय फरक असतो? भ्रष्टाचार आणि प्रामाणीकपणाचे सरकार कसे चालते? हे आपल्या लक्षात आले. (jp nadda attack on congress)

भोपाल - भाजप कार्यसमितीच्या बैठकीत दिग्गज नेत्यांनी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. गुरुवारी झालेल्या या बैठकीच्या उद्घाटन सत्राला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी वर्चुअली संबोधित केले. ते म्हणाले, दीड वर्षे आपण पाहिले आहे, की काँग्रेस सरकार कसे चालते. दीड वर्षे दक्षिणा आणि ट्रान्सफर वाले सरकार आले होते. या दीड वर्षातच, अंधःकार आणि प्रकाशात काय फरक असतो? अमावस्या आणि पौर्णिमेत काय फरक असतो? भ्रष्टाचार आणि प्रामाणीकपणाचे सरकार कसे चालते? हे आपल्या लक्षात आले. (Madhya Pradesh BJP working committee meeting jp nadda attack on congress leader kamal nath)

तत्कालीन कमलनाथ सरकारवर निशाणा साधताना नड्डा म्हणाले, किमिशनचे रुपांतर कमीशनमध्ये झाले होते. प्रत्येक वर्गाला फसवणूकीशिवाय काही मिळाले नाही. शिंदे योग्य विचारसरणीचे होते, म्हणून ते आमच्यासोबत आले. कोरोना काळाचा उल्लेख करताना जेपी नड्डा म्हणाले, गेल्या दिड वर्षात सर्वच पक्ष ICU मध्ये गेले आहेत. मात्र, भाजप कार्यकर्ते. जीव धोक्यात घालून मैदानात उतरले आहेत. यावेळी जेपी नड्डा यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि लसीकरण मोहिमेसाठी एमपी सरकार आणि संघटनेचे कौतुक केले.

सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री शिवराज यांचा राहुल गांधींवर निशाणा -उद्घाटन सत्राला संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. राहुल गांधींवर हल्ला चढवताना ते म्हणाले, तुमच्या काळात लस तयार करायला 4- 4, 5 - 5 वर्ष लागत होते. पंतप्रधान मोदींनी एप्रिल महिन्यात  टास्क फोर्स तयार केला आणि देशाला को-व्हॅक्सीन मिळाली. मध्य प्रदेशने लसीकरणाचा विक्रम केला आहे. काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. कशा दिल्या, कुठून दिल्या? जयराम रमेश, पी चिदम्बरम, दिग्विजय, कमल नाथ सर्वच एकत्र झाले आणि जनतेचा विश्वासघात केला. मात्र, आम्ही 11 लाखहून अधिक डोस देऊन विक्रम बनवला.

आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल - ज्योतिरादित्य शिंदे -देशात आणि मध्य प्रदेशात कोरोनाच्या महामारीचा फैलाव होत होता, तेव्हा काँग्रेसने राजकारण केले. काँग्रेस कधी लसीकरण करणार नाही असे सांगते, तर कधी लसींमध्ये मांस असल्याचं सांगते, आता ते स्वत:च लस घेण्यासाठी धावपळ करत आहेत. काँग्रेसला ग्वाल्हेरचे नाव बदलण्याची एवढीच इच्छा आहे, तर त्यांना आधी स्वत:चे नाव बदलावे लागले. लोकांच्या मनामध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी काँग्रेसने नाव बदलावे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले आहे. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेस