मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 10:00 IST2019-01-29T08:16:46+5:302019-01-29T10:00:53+5:30
मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी
उज्जैन - मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. रामगढ गावात सोमवारी रात्री हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नावरून परतत असताना हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेले सर्व जण हे उज्जैनचे रहिवासी होते. अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री एकच्या सुमारास वेगाने येणाऱ्या कारची धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#UPDATE Death toll rises to 12 in the accident that occurred between two cars in Ujjain early moring today https://t.co/ixGdvbOfdy
— ANI (@ANI) January 29, 2019
Madhya Pradesh: 11 people killed, 2 seriously injured in head-on collission between two cars near Ramgarh village in Ujjain district, late last night pic.twitter.com/WVLup4aec5
— ANI (@ANI) January 29, 2019