मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:31 IST2025-08-26T13:29:57+5:302025-08-26T13:31:16+5:30
PM Modi e-Vitara: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारुती सुझुकीच्या पहिले जागतिक बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल अर्थात ई-विटारा या कारला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मारूती सुझुकीच्या ई-विटारा या (battery electric vehicle) कारला हिरवा झेंडा दाखवला. मंगळवारी (२६ ऑगस्ट) सकाळी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारताच्या आत्मनिर्भरता आणि पर्यावरणीय संतुलनाचे केंद्र बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा आज विशेष दिवस आहे.' उद्घाटनाबरोबरच मेड इन इंडिया ई-विटाराची शंभर देशात निर्यात करण्याची औपचारिक सुरूवातही झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाने म्हटले की, आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाबद्दल पंतप्रधानांची असलेली कटिबद्धतेला चालना मिळाली आहे. या नव्या उपलब्धतेमुळे भारत आता सुझुकीच्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्यात करणारे केंद्र बनणार आहे.
मारूती ई-विटारा का आहे खास?
पूर्णपणे भारतात तयार केलेली मारूती सुझुकीची ई-विटारा ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. अत्याधुनिक सुविधांसह ही कार तयार केली गेली असून, उन्हाळ्याच्या दिवसात हवा खेळती रहावी अशी समोरील आसनाची व्यवस्था आहे. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ड्रायव्हिंगमध्येही सुधारणा केलेल्या असून, आरामदायक बनवण्यात आले आहे.
ई-विटारामध्ये सात एअर बॅग्ज आहेत. त्याचबरोबर ३६० डिग्री कॅमेरा, ऑटो होल्ड इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि 2 ADAS (Advanced Driver Assistance System) आदी सुविधाही आहेत. या सुविधा चालकाबरोबरच इतरांच्या सुरक्षेसाठी अधिक फायदेशीर आहेत.