शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत नर्सरी, केजीप्रमाणे लोअर केजीचाही वर्ग; सीबीएसईकडून होणार अंमलबजावणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 09:01 IST

शाळांना पायाभूत स्तरावरील पाच वर्षे कालावधीच्या शिक्षणामध्ये तीन वर्षे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी ठेवावी लागतील.

नवी दिल्ली : पूर्व प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्याकरिता नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) पायाभूत स्तरावरील शिक्षणासाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या आराखड्याची (एनसीएफ-एफएस)ची सीबीएसई शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी या शाळांना पायाभूत स्तरावरील पाच वर्षे कालावधीच्या शिक्षणामध्ये तीन वर्षे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी ठेवावी लागतील. त्यामुळे नर्सरी, केजीबरोबरच लोअर केजी या वर्गाचीही भर पडेल. 

सरकारी व केंद्रीय शाळांनी अशा हालचाली सुरू केल्या असून, या शाळांमध्ये नजीकच्या काळात पूर्व प्राथमिकचे तीन वर्ग असतील, असे सीबीएसईच्या सूत्रांनी सांगितले.  एनसीएफ-एफएस २०२२मध्ये दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी शाळांनी पायाभूत स्तरावरील पाच वर्षे कालावधीचा शिक्षण आराखडा लागू करावा असे आदेश सीबीएसईने आपल्याशी संलग्न शाळांना दिले आहेत. (वृत्तसंस्था)

बालवाटिका, जादुई पिटारा...

पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या कालावधीला ‘बालवाटिका’ असे नाव देण्यात आले आहे. या कालावधीतील वर्गांमध्ये बालकांना खेळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर भर दिला जाईल. नर्सरीमध्ये मुलांना शिकविण्यासाठी ‘जादुई पिटारा’ या नावाने शैक्षणिक अभ्यासक्रम तयार केला आहे. मुलांनी हसतखेळत शिक्षण घ्यावे, असा उद्देश आहे.

नवी पाठ्यपुस्तके

पहिली व दुसऱ्या इयत्तेसाठी एनसीईआरटीने नवी पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. पूर्व प्राथमिक शिक्षणात तीन ते ६ वर्षे वयाच्या बालकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. त्यामुळे शैक्षणिक पाया अधिक मजबूत होईल, असे सीबीएसईच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीIndiaभारत