नेपाळच्या पंतप्रधानांचं भगवान श्रीरामांवरील वक्तव्य; अयोध्येतील संत समाज भडकला, धर्मादेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:13 AM2020-07-14T11:13:24+5:302020-07-14T11:23:16+5:30

ओली म्हणाले, आपण लोक आजपर्यंत याच भ्रमात आहोत, की सीतेचा विवाह ज्या रामाबरोबर झाला, ते भारतीय आहेत. ते भारतीय नाहीत तर नेपाळचे आहेत. जनकपूरपासून पश्चिमेकडे बीरगंजजवळ ठोरी नावाचे ठिकाण आहे. तेथे एक वाल्मिकी आश्रम आहे. राजकुमार राम हे तेथीलच होते.

Lord ram ayodhya controversy ayodhya sant reaction on nepal pm kp sharma oli statement | नेपाळच्या पंतप्रधानांचं भगवान श्रीरामांवरील वक्तव्य; अयोध्येतील संत समाज भडकला, धर्मादेश जारी

नेपाळच्या पंतप्रधानांचं भगवान श्रीरामांवरील वक्तव्य; अयोध्येतील संत समाज भडकला, धर्मादेश जारी

Next
ठळक मुद्देकेपी शर्मा ओली यांनी भगवान श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याने अयोध्येतील संत समाज भडकलारामदास महाराज म्हणाले, नेपाळमध्ये माझे लाखो शिष्य आहेत आणि उद्यापासून ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरूण निदर्शने करतील. धर्मगुरू महंत परमहंस म्हणाले, केपी शर्मा स्वतःच नेपाळचे नाहीत.

लखनौ - नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भगवान श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याने अयोध्येतील संत समाज भडकला आहे. आता नेपाळमधील आपले शिष्य ओली यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असे राम दल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास महाराज यांनी म्हटले आहे. तसेच वेद आणि पुराणांतील वर्णनाचा उल्लेख करत नेपाळमध्ये शरयू नदी वाहत नाही, असेही रामदास महाराज म्हणाले.

रामदास महाराज म्हणाले, नेपाळमध्ये माझे लाखो शिष्य आहेत आणि उद्यापासून ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरूण निदर्शने करतील. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना एका महिन्याच्या आत खुर्ची सोडावी लागेल. हा धर्मादेश मी जारी करत आहे. माझ्या शिष्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने करावीत आणि ओलींना सत्तेवरून खाली खेचावे.

संपूर्ण जगाची सांस्कृतिक राजधानी अयोध्या आहे. वेद, रामायण अथवा पुराणात पाहा, त्यात स्पष्टपणे लिहिले आहे, जेथे शरयू आहे, तेथेच अयोध्या आहे. नेपाळमध्ये तर शरयू नाहीच. संपूर्ण भू-मंडळावर राजे असायचे आणि सर्वांचे चक्रवर्ती सम्राट भारताच्या उत्तर प्रदेशातील अयोध्येचे महाराज असायचे, असेही राम दल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास महाराज म्हणाले.

धर्मगुरू महंत परमहंस म्हणाले, केपी शर्मा स्वतःच नेपाळचे नाहीत. ते संपूर्ण नेपाळला पाकिस्तानप्रमाणे भिकारी बनवायच्या मार्गावर आहेत. नेपाळी जनतेच्या डोळ्यात ते धूळफेक करत आहेत. चीनने नेपाळमधील 2 डझनवर गावांवर कब्जा केला आहे. ते लपवण्यासाठी प्रभू रामाच्या नावाचा ते आश्रय घेत आहेत.

काय म्हणाले होते ओली -
ओली म्हणाले, आपण लोक आजपर्यंत याच भ्रमात आहोत, की सीतेचा विवाह ज्या रामाबरोबर झाला, ते भारतीय आहेत. ते भारतीय नाहीत तर नेपाळचे आहेत. जनकपूरपासून पश्चिमेकडे बीरगंजजवळ ठोरी नावाचे ठिकाण आहे. तेथे एक वाल्मिकी आश्रम आहे. राजकुमार राम हे तेथीलच होते. वाल्मिकी नगर नामक ठिकाण आता बिहारच्या पश्चिमेला चम्पारण जिल्ह्यात आहे. ज्याचा काही भाग नेपाळमध्येही आहे. ते वाल्मिकी रामायणाचा नेपाळी भाषेत अनुवाद करनारे नेपाळचे आदिकवी भानुभक्त आचार्य जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. 

महत्त्वाच्या बातम्या -

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

सचिन पायलटांची खेळी फेल? अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शन

CoronaVirus : खूशखबर! कोरोना व्हॅक्‍सीनवर रशियानं मारली 'बाजी'; सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा, सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वी

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

Web Title: Lord ram ayodhya controversy ayodhya sant reaction on nepal pm kp sharma oli statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.