शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवर विकास, अकरा विषयांवर चर्चा

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

समितीची पहिली बैठक : हायकोर्टात माहिती सादर

समितीची पहिली बैठक : हायकोर्टात माहिती सादर

नागपूर : जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा विकास, देखभाल व समस्या दूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या निर्देशान्वये गठित १० सदस्यीय समितीची पहिली बैठक ७ फेब्रुवारी रोजी झाली. बैठकीत घरकुल योजना, सरोवरातील शेती ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना मोबदला देणे, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इत्यादी ११ विषयांवर चर्चा करण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये जिल्हा वनाधिकारी, औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रतिनिधी, मेहकर येथील उपविभागीय अधिकारी, लोणार येथील तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, वरिष्ठ वकील सी. एस. कप्तान, ॲड. एन. बी. काळवाघे व याचिकाकर्ते सुधाकर बुगदाने यांचा समावेश आहे. हे प्रकरण बुधवारी सुनावणीसाठी आले असता बैठकीची माहिती देण्यात आली. यामुळे न्यायालयाने दोन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित केली. यापूर्वी न्यायालयाने ९ मार्च २०१० रोजी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. यानंतर जुलै-२०११ मध्ये समितीत सुधारणा केली होती. आता ही नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. लोणार सरोवराचा जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळासारखा विकास करण्यासाठी ॲड. कीर्ती निपाणकर, गोविंद खेकारे व सुधाकर बुगदाने यांनी रिट याचिका दाखल केली आहे़