शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पाच मतदारसंघ असे, जिथे काेणाचाही ठाम दावा नसे; पाठाेपाठच्या निवडणुकीत पराभवाचा वचपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 08:28 IST

दुसऱ्या टप्प्यात नौगांव, करीमगंज, सिलचर, दीफू आणि डरांग उदलगुरी या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे.

गजानन चाेपडेगुवाहाटी : १४ लोकसभा मतदारसंघ असलेल्या आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात पाच जागांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान हाेणार आहे. या जागा नेहमीच बेभरवशाच्या राहिल्या आहेत, हे आजवरच्या निकालावरून स्पष्ट होते. येथे कोणताही पक्ष विजयाचा ठाम दावा करू शकत नाही. ज्या पक्षाच्या बाजूने मतदारांनी २०१४ च्या निवडणुकीत कौल दिला होता, त्याच पक्षाला २०१९ मध्ये सपाटून मार खावा लागला आहे. 

दुसऱ्या टप्प्यात नौगांव, करीमगंज, सिलचर, दीफू आणि डरांग उदलगुरी या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. यात नौगांव मतदारसंघातून २०१४मध्ये भाजपचे राजेन गोहाईन विजयी झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रद्युत बोरदोलोई यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. सिलचर मतदारसंघात २०१४ साली काँग्रेसच्या सुष्मिता देव यांनी भाजपचा पराभव केला होता तर २०१९ मध्ये भाजपने वचपा काढत हा मतदारसंघ काबिज केला. बांगलादेशाच्या सीमेलगत असलेल्या करीमगंज मतदारसंघावर सर्व पक्षांची नजर असते. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेडिक फ्रंटने भाजपला पराभूत केले होते. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ही जागा पुन्हा बळकावली. 

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना डच्चूनौगांव मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत विजयी झालेले माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहोईन यांना डच्चू देत भाजपने यंदा रुपक शर्मा यांच्यावर विश्वास दाखवला आहे.  नौगांव मतदारसंघ हा आसाम राज्यातील प्रमुख मतदारसंघ मानला जातो. येथील साक्षरता दर राज्यात सर्वाधिक असून राजकीय घडामोडीचे हे शहर मुख्य केंद्र मानले जाते.

सिलचर लोकसभा मतदारसंघात नेहमी भाजप आणि काँग्रेसमध्येच थेट लढत असते. १९८० पासून तर आजपर्यंत येथील राजकारण काँग्रेसचे संतोष मोहन देव आणि भाजपचे कबिंद्र पुरकायस्था या दोन नेत्यांच्याच भोवती फिरत असते. २०१४ साली देव यांनी त्यांची कन्या सुष्मिता देव यांना उमेदवारी दिली आणि त्या जिंकल्या. कुशियारा नदीच्या तिरावर असलेल्या करीमगंज मतदार संघात ९० टक्के मतदार ग्रामीण भागातील आहेत. बांगलादेशच्या सीमेला लागून असल्यामुळे याठिकाणी घुसखाेरीचा प्रश्न गंभीर आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४assam lok sabha election 2024आसाम लोकसभा निवडणूक निकाल २०२४