शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

१७ तक्रारी दाखल, पंतप्रधानांविरुद्ध ठाेस कारवाई करा; काॅंग्रेसची निवडणूक आयाेगाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 07:44 IST

आयोगाचा प्रतिक्रियेस नकार, आयोगाने मोदी यांच्यावर आतापर्यंत कारवाई का केली नाही, असा सवाल  ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केला.

अलिगढ : प्रचारसभांमध्ये निवडणूक जाहीरनाम्याचा हवाला देत केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठोस, योग्य आणि स्पष्ट कारवाई करावी, अशी मागणी आज निवडणूक आयोगाकडे केली. मात्र, त्यावर कोणतेही भाष्य करण्यास निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने नकार दिला.

केंद्रात सत्तेत आल्यास काँग्रेस जनतेची संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटून देईल. आई-बहिणींची मंगळसूत्रेही  सोडणार नाही, या पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारसभांमध्ये केलेल्या विधानांमुळे काँग्रेसचे नेते क्षुब्ध झाले आहेत. मुद्यांवरुन लक्ष उडविण्याचे त्यांच्यापाशी नवनवे तंत्र आहेत,  अशी मोदी यांच्या विधानांवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगात सतरा तक्रारी दाखल केल्या. तर, आयोगाने मोदी यांच्यावर आतापर्यंत कारवाई का केली नाही, असा सवाल  ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केला.

मनमोहनसिंग यांच्या वक्तव्याचा दिला दाखलाविशिष्ट अल्पसंख्याक समाजाचा देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क आहे असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह २००६ साली म्हणाले होते. त्याचा हवाला देऊन नरेंद्र मोदी राजस्थानातील सभेत म्हणाले होते की, जे घुसखोर आहेत, ज्यांना अधिक अपत्ये आहेत अशांना लोकांची संपत्ती वाटण्यासाठी काँग्रेस तयारी करत आहे. मात्र सोमवारी झालेल्या सभेत विशिष्ट समुदायाचा उल्लेख टाळून मोदी यांनी हाच आरोप पुन्हा केला. काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या हेतूंबद्दल जनतेने सावधानता बाळगावी असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांचे काॅंग्रेस जाहीरनाम्याबाबत करणार प्रबोधन : खरगे 

काँग्रेसच्या जाहीरनाम्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीयवादाला खतपाणी घालणारी विधाने केल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सांगितले की, काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रबोधन करण्यासाठी मी त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४