शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Nirmala Sitharaman : "काँग्रेसनेच देश विकला"; राहुल गांधींच्या आरोपावर निर्मला सीतारामन यांचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:13 IST

Nirmala Sitharaman And Rahul Gandhi : राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश 'विकला' आहे असा आरोप केला. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

लोकसभेत बजेटवरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश 'विकला' आहे असा आरोप केला. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "काँग्रेसच्या यूपीए सरकारनेच देश 'विकला' होता आणि भारताला पाकिस्तानच्या बरोबरीला नेऊन ठेवलं होतं" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

निर्मला सीतारामन म्हणाल्या, "काँग्रेसनेच देश, शेतकरी, गरीब आणि राष्ट्र विकलं आहे. तुम्ही भारताला पाकिस्तानच्या बरोबरीला नेऊन ठेवलं होतं. किरण रिजिजू यांनी अगदी योग्य म्हटलं होतं की, भारत विकू शकेल असा कोणीही जन्माला आलेला नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असं कधीच करणार नाहीत."

अर्थमंत्र्यांनी २००९ च्या शर्म अल-शेख (इजिप्त) येथील संयुक्त निवेदनाचा संदर्भ दिला, जिथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यात बैठक झाली होती. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर अवघ्या सात महिन्यांत ही बैठक झाली होती. सीतारामन पुढे म्हणाल्या, "ज्या लोकांना शर्म अल-शेखमध्ये पाकिस्तानशी चर्चा करायची होती, ते आता आम्हाला चर्चेवर सल्ला देत आहेत."

काँग्रेसनेच देश विकला - सीतारामन

अर्थमंत्र्यांनी पुढे असंही नमूद केलं की, यूपीए सरकारने जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) बाली बैठकीतही भारताच्या हिताशी तडजोड केली होती. २०१३ च्या करारामध्ये 'ट्रेड फॅसिलिटेशन एग्रीमेंट' (TFA) आणि सार्वजनिक साठा (अन्न सुरक्षा) वरील 'पीस क्लॉज' मान्य करून गरीब आणि शेतकऱ्यांचं हित विकलं गेलं. "काँग्रेसने केवळ गरीब आणि शेतकऱ्यांचं हितच विकलं नाही, तर देशालाच विकलं" अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress sold the country: Nirmala Sitharaman slams Rahul Gandhi.

Web Summary : Nirmala Sitharaman retorted to Rahul Gandhi's allegations, stating the Congress-led UPA government compromised India's interests. She accused them of equating India with Pakistan and sacrificing farmers' welfare in global trade deals.
टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारत