शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीच्या वारेमाप खर्चावर बडगा

By admin | Updated: February 12, 2015 23:06 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील राजकीय देणग्यांचा मुद्दा गाजत असतानाच लोकसभा निवडणुकीतील वारेमाप खर्चाच्या तपशिलाकडे निवडणूक आयोगाने वक्रदृष्टी वळवली आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील राजकीय देणग्यांचा मुद्दा गाजत असतानाच लोकसभा निवडणुकीतील वारेमाप खर्चाच्या तपशिलाकडे निवडणूक आयोगाने वक्रदृष्टी वळवली आहे. आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या निधीसंबंधी तपशील केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपने २०१३-१४ या वर्षात ३१ मार्चपर्यंत ३६३ कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचा दावा केला असून, या पक्षाने लोकसभा निवडणुकीवर जवळजवळ दुप्पट ७१४ कोटी रुपये खर्च केले आहेत.बनावट कंपन्यांच्या नावाने धनादेश देण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर आयकर विभागाने विविध कंपन्यांसह दोन राजकीय पक्षांना अलीकडेच नोटीस बजावल्या असताना लोकसभा निवडणुकीत प्रचंड खर्च करणाऱ्या पक्षांना देणग्या देणाऱ्या कंपन्या खऱ्या आहेत का? याची शहानिशा आयकर विभागाने चालविली आहे. मार्च ते मे या काळात काही पक्षांनी केलेला खर्च उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असल्याचे आढळून आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात द्रमुक वगळता कोणत्याही पक्षाने मिळालेल्या निधीची माहिती दिलेली नाही. या पक्षाला २०१३-१४ या वर्षात ८० कोटी मिळाले असून वैयक्तिक देणगी ७७ लाख रुपये मिळाली. वैयक्तिक देणगी २० हजारांवर असल्यास माहिती देणे बंधनकारक आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीवर ५१६ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. प्रत्यक्षात या पक्षाने मिळालेला निधी फक्त ५९ कोटी रुपये दाखविला आहे. उर्वरित देणगीदारांची नावे या पक्षाने दिलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला १५ कोटी रुपये मिळाले असताना लोकसभा निवडणुकीवर ५१ कोटी रुपये खर्च केले. बसपाला २० हजार रुपयांपेक्षा जास्त वैयक्तिक देणगी मिळालेली नाही. मात्र, या पक्षाने लोकसभा निवडणुकीवर ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केले. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत एकही जागा न मिळालेल्या आम आदमी पार्टीने खर्चाचा तपशील दिलेला नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. ( लोकमत न्यूज नेटवर्क)