२५० दहशतवादी मारल्याचा आकडा आला कुठून?; अमित शहांनी सांगितला 'सोर्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 12:18 PM2019-03-13T12:18:34+5:302019-03-13T12:22:14+5:30

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं होतं

Lok Sabha Elections 2019 - 250 terrorist killed in air strike, how to reveal figure Says Amit Shah | २५० दहशतवादी मारल्याचा आकडा आला कुठून?; अमित शहांनी सांगितला 'सोर्स'

२५० दहशतवादी मारल्याचा आकडा आला कुठून?; अमित शहांनी सांगितला 'सोर्स'

Next

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं होतं, नेमका हा आकडा अमित शहा यांनी कशाच्या आधारावर केला असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता त्यावर अखेर अमित शहा यांनी मौन सोडलं आहे. 

एअर स्ट्राइकनंतर देशभरात जे वातावरण निर्माण झालं होतं, अनेक माध्यमातून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एवढे दहशतवादी मारले अशी चर्चा सुरु होती. माध्यमांमध्येही एअऱ स्ट्राइकनंतर 250 ते 300 दहशतवादी मारल्याचा दावा केला होता. मी सरकारचा प्रतिनिधी नाही, जी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होती त्याच आधारावर मी ते वक्तव्य केलं असल्याचं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडीया या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शहा बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणा झाल्यानंतर अमित शहा यांची ही पहिली मुलाखत आहे. 

पाकिस्तानच्या मिडीयामध्ये आणि संसदेत असा दावा केला की, पाकिस्ताने भारतात 20 लढाऊ विमाने पाठवली त्यांच्या या खोट्या दाव्याने कळून येतं की पाकिस्तानला एअर स्ट्राइकचा किती धसका बसला असेल. पाकिस्तानात दहशतवादी मारले गेले असा पाकिस्तानी मिडीया बोलत आहे तर भारतात विरोधी पक्ष या एअर स्ट्राइकबाबत पुरावे मागत आहे. 

या मुलाखतीत अमित शहा यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी यांच्या सारखे कणखर नेतृत्व आहे. मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेत देशाने आघाडी घेतली आहे. सध्या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं हा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात देशाला सुरक्षित ठेवण्याची क्षमता आहे. निवडणुकीच्या काळात देशाची सुरक्षा हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. देशात मोदींच्या नेतृत्वात बहुमतात सरकार आलं तर राष्ट्रीय सुरक्षा मजबूत बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 40 सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारताने बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून एअर स्ट्राइक केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून दहशतवाद्यांना बालकोट भागात प्रशिक्षण दिलं जातं होतं. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर एअर स्ट्राइक करत मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. 
 

Web Title: Lok Sabha Elections 2019 - 250 terrorist killed in air strike, how to reveal figure Says Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.