शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
4
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
5
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
6
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
7
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
8
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
9
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
10
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
11
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
12
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
13
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
14
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
15
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
16
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
17
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
18
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
19
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
20
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : हिंदी भाषिक पट्ट्याने बिघडविले भाजपचे गणित, इंडिया आघाडीला मिळाली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 10:46 IST

Lok Sabha Election Result 2024 : उत्तरप्रदेशमधील २९ जागांसह हिंदी भाषिक राज्यांमध्ये पक्षाने एकूण ४९ जागा गमावल्या.

नवी दिल्ली : गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, उत्तरप्रदेशपासून ते बिहारपर्यंत हिंदी भाषिक पट्ट्यात मोठा विजय मिळविला. २०२४ च्या निवडणुकीत पक्षासाठी परिस्थिती वेगळी आहे. उत्तरप्रदेशमधील २९ जागांसह हिंदी भाषिक राज्यांमध्ये पक्षाने एकूण ४९ जागा गमावल्या.

भाजपने राजस्थानमध्ये १० आणि हरयाणा व बिहारमध्ये प्रत्येकी ५ जागा गमावल्या आहेत. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांत भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा चांगले यश मिळविले. राजस्थानमध्ये गतवर्षी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवूनही भाजपने यंदा १० जागा गमावल्या. 

जाट पट्ट्यात पक्षाचा मोठा पराभव झाला. आदिवासी मतदारांनीही नवीन भारत आदिवासी पक्षावर विश्वास दाखवल्याने भाजपने २०१९ मध्ये जिंकलेली बांसवाडा जागा गमावली. मागासवर्गीय मतदारांचा एक भागही भाजपपासून दूर गेल्याने भरतपूर व करौली-धोलपूरसारख्या जागा गमावल्या.

ज्येष्ठ नेते राहिले दूरमाजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह निवडणूक लढवत असलेल्या झालावाडच्या जागेशिवाय इतरत्र प्रचार केला नाही. चुरू मतदारसंघात भाजप खासदार राहुल कासवान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते जिंकले. 

अंतर्गत कुरघोडींचाही बसला फटकाहरयाणामध्ये जाट आणि शेतकरी पक्षाच्या विरोधात राहिले. मात्र, पक्षाच्या अनेक उमेदवारांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदारांच्या असहकाराचा मुद्दा उपस्थित केला. सिरसा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अशोक तंवर यांनी उघडपणे पक्षाच्या काही नेत्यांवर पक्षासाठी काम न केल्याचा आरोप केला. सोनीपत, अंबाला आणि हिसारसारख्या इतर जागांवरही हीच स्थिती होती. बिहारमध्ये भाजप नेते मोठ्या प्रमाणात ‘मोदी मॅजिक’वर अवलंबून होते. 

उत्तर प्रदेशमुळे बिघडले समीकरणसुरुवातीच्या पक्षाच्या अहवालांनुसार, उत्तरप्रदेशात अनेक विद्यमान खासदारांविरुद्ध नाराजी होती आणि भाजप यात अनेक बदल करेल अशी अपेक्षा होती. पक्षाने काही बदल केलेही. पण, सलग दोन वेळा जिंकणाऱ्या खासदारांना त्यांनी यंदा पुन्हा उमेदवारी दिली. पंतप्रधान मोदींची गॅरंटी आणि व्यापक प्रचारामुळे भाजपला विश्वास होता की, ते विद्यमान उमेदवारांविरुद्ध असलेल्या सत्ताविरोधी लाटेवर मात करतील. मात्र, तसे झाले नाही आणि पक्षाचे मोठे नुकसान झाले. 

२५%  जागा झाल्या कमी राज्य          जागा    मतांची टक्केवारी     २०१९     २०२४     २०१९     २०२४ उत्तर प्रदेश     ६२     ३३     ४९.६     ४१.४मध्य प्रदेश     २८     २९     ५८.०     ५९.३गुजरात     २६     २५     ६२.२     ६१.९राजस्थान     २४     १४     ५८.५     ४९.२बिहार     १७     १२     २३.६     २०.५हरयाणा     १०     ५     ५८.०     ४६.१छत्तीसगड    ९     १०     ५०.७     ५२.७दिल्ली    ७    ७     ५६.६     ५४.४उत्तराखंड    ५    ५     ६१.०     ५६.८हिमाचल    ४    ४     ६९.१     ५६.४ एकूण     १९२     १४४     ५०.४     ४५.४

या राज्यांत १३ जागा घटल्याराज्य          जागा    मतांची टक्केवारी     २०१९    २०२४    २०१९    २०२४कर्नाटक    २५    १७    ५१.४    ४६.१महाराष्ट्र    २३    ९    २७.६    २६.१प. बंगाल    १८    १२    ४०.३    ३८.७झारखंड    ११    ८    ५१.०    ४४.६आसाम    ९    ९    ३६.१    ३७.४ओडिशा    ८    २०    ३८.४    ४५.३तेलंगणा    ४    ८    १९.५    ३५.१त्रिपुरा    २    २    ४९.०    ७०.७अरुणाचल    २    २    ५८.२    ४८.९मणिपूर    १    ०    ३४.२    १६.६आंध्र प्रदेश    -    ३    १.०    ११.३मिझोराम    -    ०    ५.७    ६.८मेघालय    -    ०    ७.९    -सिक्किम    -    ०    ४.७    ५.१एकूण    १०३    ९०    ३२.८    ३४.३ 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी