शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

Lok Sabha Election Result 2024 : भाजप ‘इंडिया’वर भारी, इंडिया आघाडीने २३४ तर भाजपने जिंकल्या २४० जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 11:39 IST

Lok Sabha Election Result 2024 : भाजपला सर्वाधिक यश मिळाले ते देशाच्या मध्यवर्ती भागात. पश्चिमेकडील गुजरातपासून ते राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशात भाजपला दमदार यश मिळाले.

नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालात भाजपसह एनडीएने एकूण २९२ जागा जिंकत आघाडी घेतली असली, तरी इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकत कडवे आव्हान दिले. दोन्ही गटातील घटकपक्षांची आकडेवारी लक्षात घेता, पक्षीय बलाबलाचा विचार करत एकट्या भाजपने जिंकलेल्या २४० जागा या एकूण इंडिया आघाडीच्या २३४ जागांच्या तुलनेत अधिक आहेत. त्यामुळे निकालात भाजपने बाजी मारल्याचा आणि त्यांनी एकट्याने संपूर्ण इंडिया आघाडीवर मात केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

सर्वाधिक यश कुठे?भाजपला सर्वाधिक यश मिळाले ते देशाच्या मध्यवर्ती भागात. पश्चिमेकडील गुजरातपासून ते राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशात भाजपला दमदार यश मिळाले. उत्तरेत दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पैकीच्या पैकी जागा मिळवल्या. त्याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळमध्ये मिळालेल्या जागा हा भाजपसाठी बोनस ठरल्या.  ईशान्येकडील राज्यांनीही भाजपला चांगली साथ दिली. या सर्वांच्या बळावर एकट्या भाजपला २४० पर्यंत मजल मारता आली. त्यातही मित्रपक्षांना सोबतीला घेत एनडीएची मजल २९२ जागांपर्यंत पोहोचल्याने सत्तानाट्याच्या स्पर्धेत ते आघाडीवर आहेत.

काँग्रेसमध्ये आनंद का?इंडिया आघाडी जिंकलेल्या जागांचा विचार केल्यास, कॉंग्रेसने देशभरात ९९ जागांवर यश मिळवित, सर्वांत मोठा पक्ष ठरला. काँग्रेसच्या या यशात साथ दिली ती केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांनी. त्यातही महाराष्ट्रात काँग्रेस १ वरून १३ वर पोहोचणे आणि २०१९ मध्ये ५२ जागांवरून ९९ पर्यंत मजल मारणे ही काँग्रेससाठी आत्मविश्वास वाढविणारी बाब आहे. त्याशिवाय इंडियातील प्रमुख घटकपक्ष असलेल्या सपाने उत्तर प्रदेशात जिंकलेल्या ३८, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या २९, बिहारमध्ये राजदच्या ४ आणि अन्य घटकपक्षांच्या मदतीने इंडिया आघाडीने २३४ जागांपर्यंत मजल मारली. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल