शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील भाजपाच्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर योगी घेणार मोहन भागवत यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 15:33 IST

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला दारुण परभावचा सामना करावा लागला होता. उत्तर प्रदेशात असलेल्या लोकसभेच्या ८० जागांपैकी केवळ ३३ जागांवर भाजपाला विजय मिळवता आला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला दारुण परभावचा सामना करावा लागला होता. उत्तर प्रदेशात असलेल्या लोकसभेच्या ८० जागांपैकी केवळ ३३ जागांवर भाजपाला विजय मिळवता आला. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या झालेल्या सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. योगी आणि सरसंघचालक यांच्यात होणाऱ्या या भेटीमध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि राज्यातील संघाच्या विस्तारासह इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी मोहन भागवत यांनी चिउटाहा येथील एसव्हीएम पब्लिक स्कूल येथे सुरू असलेल्या संघ कार्यकर्ता विकास शिबिरामध्ये स्वयंसेवकांना संबोधित केले. हे शिबीर ३ जूनपासून सुरू आहे. तसेच त्यामध्ये २८० हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे.  दरम्यान, गुरुवारी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काशी, गोरखपूर, कानपूर आणि अवध या भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची  जबाबदारी सांभाळत असलेल्या सुमारे २८० स्वयंसेवक कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. 

मिळालेल्या माहितीनुसार सरसंघचालकांनी शाखांची संख्या वाढवण्यासाठी आणि संघटनेच्या विस्तारावर अधिक भर दिला. तसेच संघाकडून चालवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या विस्ताराबाबत सल्ला दिला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षेनुरूप न लागल्याने मागच्या काही काळापासून संघाचे नेते भाजपाबाबत सातत्याने प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.  

 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघyogi adityanathयोगी आदित्यनाथMohan Bhagwatमोहन भागवतUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४