शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांना एकजूट करण्याच्या प्रयत्नांना वेग; नितीशकुमार मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला, राहुल गांधीही उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 18:00 IST

या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह आणि बिहार सरकारचे मंत्री संजय झा हेही उपस्थित होते.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विरोधी पक्षांना एकजूट करण्यासाठी प्रयत्नांना वेग दिला आहे. नितीश कुमार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. या ठिकाणी एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह आणि बिहार सरकारचे मंत्री संजय झा हेही उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे तेजस्वी यादव बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. याआधी शनिवारी कर्नाटकातील नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात 18 विरोधी पक्षांचे नेते एकाच मंचावर दिसले आणि विरोधकांच्या ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जेडीयू अध्यक्ष ललन सिंह, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीही या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नितीश कुमार गेल्या काही महिन्यांपासून विरोधी एकजुटीसाठी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांतर्गत मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा आणि भेट घेतली आहे. दुसरीकडे नितीश कुमार यांनीही अनेक विरोधी नेत्यांची भेट घेऊन त्यांना एकाच व्यासपीठावर येण्याचा सल्ला दिला आहे. येत्या काही दिवसांत बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

रविवारी केजरीवालांची घेतली होती भेटनितीश कुमार यांनी गेल्या महिन्यात दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. तेव्हा त्यांच्यासोबत तेजस्वी यादवही उपस्थित होते. याशिवाय रविवारी (21 मे) नितीश कुमार यांनी त्यांची दिल्लीतील आपचे राष्ट्रीय संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. नितीश कुमार म्हणाले होते की, अरविंद केजरीवाल दिल्लीत चांगले काम करत आहेत आणि त्यांच्या सरकारला काम करण्यापासून रोखले जात आहे, हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आम्ही म्हणत आहोत.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधी