संबित पात्रा म्हणजे डराव डराव करणारे पावसाळी बेडूक : नवज्योतसिंग सिध्दू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 14:23 IST2019-05-13T14:22:06+5:302019-05-13T14:23:45+5:30
'हाथी चले बीच बाजार, आवाज़ें आएं एक हज़ार' अशा शब्दात सिध्दू यांनी संबित पात्रा यांची खिल्ली उडवली.

संबित पात्रा म्हणजे डराव डराव करणारे पावसाळी बेडूक : नवज्योतसिंग सिध्दू
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्याचे १९ तारखेला मतदान पार पडणार आहे. त्याआधी, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची तुलना बेडकाशी केली आहे. ते एका सभेमध्ये बोलत होते.
पावसाळी बेडूक जेव्हा डराव डराव करत असतो. अशावेळी कोकीळ नेहमीच शांत राहते. 'हाथी चले बीच बाजार, आवाज़ें आएं एक हज़ार' अशा शब्दात सिध्दू यांनी संबित पात्रा यांची खिल्ली उडवली. महिलांचा सन्मान करण्याची गोष्ट तुम्ही करता पण तुमच्या जाहिरातीच्या फोटोतील महिलासुध्दा सिलिंडर विकत घेऊ शकत नाही. चुलीवर स्वंयपाक करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. संबित पात्रा यांच्यावर टीका करतानाचा व्हिडिओ सिध्दू यांनी त्यांच्या टि्वटरवर पोस्ट केला आहे.
मौसमी मेंढक जब टर..टर..टर.. करता है,
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) May 12, 2019
तो कोयल चुप रहता है|
हाथी चले बीच बाज़ार,
आवाज़ें आएं एक हज़ार| pic.twitter.com/6iFnPFsmnE
मध्यप्रदेशात जेव्हा शिवराज सिंह यांची सत्ता होती, त्यावेळी या राज्यात सर्वाधिक बलात्कार झाले. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा आकडा वाढला आहे. त्याचवेळी दुसरीकडे मोदी महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारत होते, अशी टीकाही सिद्धू यांनी केली.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना 'काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करा' असे म्हंटले होते. मोदी जरी काळे असले तरीही देशाचे रक्षण करणारे आहेत असे उत्तर संबित पात्रा यांनी सिद्धूना दिले होते. त्यावर पात्रा यांचा समाचार घेणारं ट्विट सिद्धू यांनी केलं आहे.