अक्षय कुमारला नमो टीव्हीचा अँकर बनवायला पाहिजे : असदुद्दीन ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 11:38 IST2019-04-29T11:31:17+5:302019-04-29T11:38:24+5:30

आंबा कसा खातात जर माहित नसेल तर हा प्रश्न कशाला विचारला असे म्हणत, ओवैसी यांनी अक्षय कुमार बरोबर पंतप्रधान यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.

lok sabha election 2019  Akshay Kumar make an anchor of Namo TV: Asaduddin Owaisi | अक्षय कुमारला नमो टीव्हीचा अँकर बनवायला पाहिजे : असदुद्दीन ओवैसी

अक्षय कुमारला नमो टीव्हीचा अँकर बनवायला पाहिजे : असदुद्दीन ओवैसी

मुंबई –बॉलिवूडमधील खिलाडी अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. मुलाखतीनंतर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. अक्षय कुमारला नमो टीव्हीचे अँकर बनवायला पाहिजे अशी टीका एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. एका प्रचार सभेतील भाषणात ते बोलत होते.

आपण आंबा खातात का आणि तो कसा खातात, असा प्रश्न पंतप्रधानांच्या मुलाखतीत विचारणाऱ्या सिनेअभिनेता अक्षय कुमारची एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी खिल्ली उडवली. आंबा कसा खातात जर माहित नसेल तर हा प्रश्न कशाला विचारला असे म्हणत, ओवैसी यांनी अक्षय कुमार बरोबर पंतप्रधान यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.

वृत्तवाहिनीच्या अँकर यांना अभिनय जमत नाही म्हणून मोदींनी अभिनेत्यालाच अँकर करून टाकले. अक्षय कुमारला आता नमो टीव्हीचा अँकर बनवायला पाहिजे असा टोला ओवैसींनी लागवला. सनेअभिनेता अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या मुलाखातीत पंतप्रधान मोदींनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले होते.

मला आंबे खाण्याची आवड आहे. कुटुंबातील परिस्थिती चांगली नसल्याने खरेदी करणे शक्य नव्हते . त्यामुळे, लहानपणी शेतात जाऊन झाडावर पिकलेले आंबे खात असे. अक्षयला दिलेल्या मुलाखतीत लहानपणीची आठवण सांगताना  मोदींनी माहिती दिली होती.

Web Title: lok sabha election 2019  Akshay Kumar make an anchor of Namo TV: Asaduddin Owaisi