शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

चिंता वाढली! कोरोना पाठोपाठ देशावर येतंय आणखी एक मोठं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 12:39 IST

कोरोना व्हायरसच्या संकटाने आव्हान उभं केलं असतानाच आता आणखी एक मोठं संकट देशावर येत असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगाला विळखा घातला आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. व्हायरसच्या संकटाने आव्हान उभं केलं असतानाच आता आणखी एक मोठं संकट देशावर येत असल्याची माहिती समोर आली आहे. देशात टोळधाड धडकणार असल्याची चिंताजनक माहिती मिळत आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा देशात टोळधाडीचं संकट येणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने दिला आहे. 

येत्या दोन आठवड्यांमध्ये पुन्हा एकदा भारतावर टोळधाडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण होऊ शकतं. पश्चिमेकडून चार हजार किलोमीटर दूरवरून हा टोळधाडीचा हल्ला सुरू झाला आहे. मान्सूनपूर्वी मे महिन्यात टोळधाड दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातून राजस्थानात दाखल झाली. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरले आहेत. मध्यप्रदेशाच्या सीमेवरून मोर्शी, वरूड व मेळघाटात टोळधाड दाखल झाली. वाळवंटी टोळांनी राज्यातील 20 जिल्ह्यांतील 90 हजार हेक्टरवरील पिके फस्त केली. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.

FAO ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात टोळधाड राजस्थानमध्ये येण्याची शक्यता आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी केली तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान टाळता येऊ शकतं असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी जुलैमध्ये पुन्हा एकदा देशात टोळधाडीचं संकट येणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने दिला होता. त्यानंतर केंद्राने राजस्थान आणि मध्य प्रदेशसह 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला. 

तज्ज्ञांच्या मते पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील शेती खराब करणारे टोळधाड एप्रिलमध्ये पाकिस्तानातून भारतात आले. उत्तर-पूर्व सोमालियाला पोहोचणारे टोळधाड उत्तर हिंद महासागरातील भारत-पाकिस्तान सीमा भागात प्रवेश करणार आहे. शेतावर पिके कमी असल्यामुळे टोळ सध्या झाडे आणि अन्य खाद्यपदार्थांना लक्ष्य बनवीत आहेत. पिकांची अनुपलब्धता असल्यामुळेच टोळ पाकिस्तानातून इतके अंतर पार करून भारताच्या विविध राज्यांत शिरले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बापरे! परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

CoronaVirus News : भयंकर! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका

CoronaVirus News : कोरोना वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

Video - शाब्बास मित्रा, जिंकलंस! गाढवाची मुलाखत घेऊन पत्रकाराने मास्क न लावणाऱ्यांना शिकवला चांगलाच धडा

"वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज"; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

टॅग्स :IndiaभारतRajasthanराजस्थानFarmerशेतकरीMadhya Pradeshमध्य प्रदेशPakistanपाकिस्तान