शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पहिल्या निवडणुकीच्या वेळी साक्षरतेचे प्रमाण होते फक्त १६ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 05:36 IST

पहिली सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर १९५१ ते मार्च ५२ या काळात झाली. त्या वेळी प्रशासनाला निवडणूक घेण्याचा व लोकांना मतदान करण्याचा अनुभव नव्हता.

- खुशालचंद बाहेती मुंबई  - पहिली सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर १९५१ ते मार्च ५२ या काळात झाली. त्या वेळी प्रशासनाला निवडणूक घेण्याचा व लोकांना मतदान करण्याचा अनुभव नव्हता. साक्षरतेचे प्रमाण फक्त १६ टक्के होते. महिलांमध्ये हे प्रमाण त्याहूनही कमी होते.सुकुमार सेन या आयसीएस अधिकाऱ्याची पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली. पहिले आव्हान त्यांच्यासमोर होते. २१ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या १७ कोटी ६० लाख मतदारांच्या नावाच्या याद्या बनविण्याचे. अनेक महिला नाव सांगण्यासाठी समोर येत नसत, त्यामुळे नोंदणीत अनेक अडचणी येत. काहींची नावे बेबी/राणी/दीदी इतकीच नोंदविली गेली. मुख्य निवडणूक आयुक्तांनी अशी सर्व नावे यादीतून वगळण्याचा आदेश दिला. त्यामुळे २० लाख नावे कमी झाली. मतदारयाद्या टाइप करण्यासाठी ६ महिन्यांसाठी १६ हजार ५०० क्लर्कची भरती करण्यात आली आणि ३ लक्ष ८० हजार रीम कागदावर या याद्या टाइप करण्यात आल्या. देशातील पहिल्या मतदाराचे नाव होते हिमाचल प्रदेशचे शाम सरन नेगी यांचे.तेव्हा ४८९ लोकसभा व ४००० विधानसभेच्या जागांसाठी एकाच वेळी निवडणूक झाली. मतदानासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणून प्रत्येक उमेदवारासाठी एक मतपेटी ठेवावी व ज्या मतपेटीत सर्वाधिक मते तो विजयी, सोपी पद्धत निवडली. देश पातळीवरील १४ व राज्य पातळीवरील ५९ पक्षांना मान्यता देण्यात आली. त्यांना रोजच्या उपयोगातील बैलगाडी, धान्य, विळा, झोपडी, मातीची भांडी आदी वस्तू निवडणूक चिन्ह म्हणून देण्यात आले. मतपेटीवर ही चिन्हे चिकटविली होती. या निवडणुकीसाठी विशिष्ट प्रकारची लॉक सिस्टीम असलेल्या २४ लक्ष ७३ हजार ८५० मतपेट्या बनवण्यात आल्या. यासाठी ८२०० टन स्टीलचा वापर झाला. या मतपेट्या ठेवून ने-आण करण्यासाठी लाखो लाकडी पेट्या बनवण्यात आल्या. एकूण २ लक्ष २४ हजार बुथवर हे मतदान झाले. यासाठी ५६ हजार प्रीसायडिंग आॅफिसर आणि २ लक्ष ८० हजार मदतनीस नेमले होते. तसेच २ लक्ष २४ हजार पोलिसांना तैनात केले होते.44.87%मतदान झालेल्या निवडणुकीत मतदारांच्या बोटावर लावण्यासाठी शाईच्या ३ लक्ष ८९ हजार ८१६ बाटल्या वापरण्यात आल्या.मतदानासाठी शिक्षणसिनेमा, रेडिओ, मॉक इलेक्शनद्वारे मतदान कसे करावे, याचे शिक्षण देण्यात आले.खर्चाची मर्यादाया निवडणुकीत उमेदवारांसाठी विधानसभेसाठी २०० रु. आणि लोकसभेसाठी ७००० रु. खर्चाची मर्यादा होती.

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूक