'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:38 IST2025-07-30T15:35:39+5:302025-07-30T15:38:24+5:30
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसवर इतिहासाची भीती असल्याचा आरोप केला. त्यांनी सिंधू पाणी कराराबद्दल नेहरूंच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
आज राज्यसभेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसवर टीका केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्थगित करण्यात आलेल्या सिंधू पाणी करारावरूनही त्यांनी टीका केली.
'ऑपरेशन सिंदूर'बाबत विरोधक अनेकदा सरकारवर आरोप करत आहेत. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करार केला आहे, असल्याचा दावा करत आहेत. हा दावा भारत सरकार हे आरोप फेटाळला आहे.
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
राज्यसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले, "मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी काळजीपूर्वक ऐकावे. २२ एप्रिल ते १६ जूनपर्यंत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात एकही फोन कॉल झाला नाही.
यावेळी एस जयशंकर यांनी इतिहासाचे संदर्भही दिली. जयशंकर म्हणाले, "काही लोक इतिहास विसरू इच्छितात. कदाचित ते त्यांना शोभत नसेल. त्यांना फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात ज्या त्यांच्या मनाला आनंद देतात."
'नेहरूंच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले'
एस जयशंकर यांनी १९६० मध्ये संसदेत जवाहरलाल नेहरूंच्या विधानाची आठवण करून दिली. "३० नोव्हेंबर १९६० रोजी नेहरू म्हणाले होते की संसदेने पाण्याचे प्रमाण किंवा पैशाच्या व्यवहाराचा निर्णय घेऊ नये. लोकांनी त्याला विरोध केला",असंही जयशंकर म्हणाले.
"नेहरू म्हणाले होते की हा करार पाकिस्तानी पंजाबच्या हिताचा आहे. पण त्यांनी काश्मीर, पंजाब, राजस्थान किंवा गुजरातमधील शेतकऱ्यांबद्दल एकही शब्द बोलले नाहीत', असा टोलाही जयशंकर यांनी लगावला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंच्या चुका सुधारण्याचे काम केले आहे. आम्हाला ६० वर्षांपासून सांगितले जात होते की काहीही होऊ शकत नाही. नेहरूंच्या चुका सुधारता येत नाहीत. परंतु मोदी सरकारने ते शक्य आहे हे दाखवून दिले. कलम ३७० रद्द करण्यात आले आणि आता सिंधू पाणी करार देखील दुरुस्त केला जात आहे", असंही एस जयशंकर म्हणाले.
"जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पूर्णपणे पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित राहील. "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही", असा इशारा आम्ही दिल्याचे त्यांनी सांगितले.
"हा करार त्या काळातील चुकीच्या धोरणांचा परिणाम होता. त्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले . ते इतिहासापासून धडा घेण्यास तयार नाही",असा टोलाही त्यांनी लगावला.
#WATCHराज्यसभा में ऑपरेशन सिन्दूर पर चर्चा के दौरान विदेश मंत्री डॉ. एस जयशंकर ने कहा, "...मैं उनको कहना चाहता हूं, वो कान खोलकर सुन ले। 22 अप्रैल से 16 जून तक, एक भी फोन राष्ट्रपति ट्रंप और प्रधानमंत्री मोदी के बीच में नहीं हुआ।" pic.twitter.com/5pF9coCEot
— ANI_HindiNews (@AHindinews) July 30, 2025