द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळली, शहारे आणणारे दृश्य पाहून लोक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 11:33 PM2021-07-13T23:33:59+5:302021-07-13T23:34:52+5:30

Lightning struck Shree Dwarkadhish Mandir: द्वारका येथे असलेल्या भगवान श्री कृष्णाच्या द्वारकाधीश मंदिरावर मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळली. आश्चर्याची बाब म्हणजे यादरम्यान कुणालाही कसलीही दुखापत झाली नाही.

Lightning struck Dwarkadhish temple, people said seeing the scene bringing the city ... | द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळली, शहारे आणणारे दृश्य पाहून लोक म्हणाले...

द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळली, शहारे आणणारे दृश्य पाहून लोक म्हणाले...

googlenewsNext

अहमदाबाद - गुजरातमधील धार्मिक नगरी असलेल्या द्वारका येथे आज एक दुर्मीळ घटना घडली. द्वारका येथे असलेल्या भगवान श्री कृष्णाच्या द्वारकाधीश मंदिरावर मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळली. आश्चर्याची बाब म्हणजे यादरम्यान कुणालाही कसलीही दुखापत झाली नाही. मात्र थेट मंदिराच्या कळसावर वीज कोसळल्याने कळसावर असलेल्या ध्वजाचे नुकसान झाले. दरम्यान, अंगावर शहारे आणणारे हे दृश्य पाहिल्यानंतर निसर्गाच्या या कहराला द्वारकाधीशांनी स्वत:कडे ओढून घेतले आणि भाविकांचे रक्षण केले अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे.

दरम्यान, हवामान खात्याने गुजरातमधील द्वारकेसह किनारी भागांसह इतर काही भागांत १४ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार आज द्वारकेमध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसादरम्यान, अचानक मोठ्याने वीजेचा कडकडाट झाला आणि मोठ्या आवाजासह वीज मंदिरावर कोसळली. मात्र यादरम्यान तिथे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र मंदिराच्या कळसावरील ध्वज फाटला.

द्वारकाधीश मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. हे मंदिर जगत मंदिराच्या नावानेही ओळखले जाते. गुजरातमध्ये असलेले हे मंदिर ५०० किंवा  एक हजार नव्हे तर तब्बल २५०० हजार वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येते. पौराणिक कथांमध्येही हे मंदिर चार धाम यात्रेमध्ये समाविष्ट आहे.

दरम्यान, हवामान खात्याने आपल्या नव्या अंदाजामध्ये सौराष्ट्र-कच्छ क्षेत्रासह गुजरातच्या अनेक भागात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली, दमण आणि दीवमध्ये १४ जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर दक्षिण गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  

Web Title: Lightning struck Dwarkadhish temple, people said seeing the scene bringing the city ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.