शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

पहिलवानासारखा रिगणात उतरणार!

By admin | Updated: February 14, 2015 00:43 IST

आपला विजय अथवा पराभव याबाबत अजिबात भीती न बाळगता आपण एका पहिलवानासारखे रिंगणात उतरणार, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी

पाटणा : आपला विजय अथवा पराभव याबाबत अजिबात भीती न बाळगता आपण एका पहिलवानासारखे रिंगणात उतरणार, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी २० फेब्रुवारीला आपले सरकार विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. ‘प्रतिस्पर्धी किती बलवान आहे आणि मी जिंकणार की हरणार याची अजिबात चिंता न करता एखाद्या पहिलवानासारखा मी रिंगणात उतरणार आहे. समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी मी उभा आहे, असे भावनिक भाषण मी आमदारांसमोर करणार आहे. तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर माझ्या सोबत या आणि मला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही, तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन,’ असे मांझी म्हणाले. भाजपचा पाठिंबा मिळणार का, असे विचारले असता मांझी म्हणाले की, ‘मी एकटाच उभा आहे. गरीब आणि दुर्बल लोकांसाठी यापुढेही काम करू द्या, हे माझे आवाहन स्वीकार करण्याची नम्र विनंती मी सर्व पक्षांच्या आमदारांना करणार आहे. लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने मी राजकारणात आलो.’बिहारमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. त्याकडे लक्ष वेधले असता मांझी म्हणाले की, ‘मी गरीब आणि कंगाल माणूस आहे. माझ्याजवळ घोडेबाजारासाठी पैसा नाही. खरे पाहता तेच (नितीशकुमार गट) आमदारांना दिल्लीला नेऊन आणि त्यांना आलिशान हॉटेलात ठेवून घोडेबाजार करीत आहेत. दिल्ली प्रवासात प्रत्येक आमदारावर एक लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.’ नितीशकुमारांनी घोडचूक केली!मांझी यांना मुख्यमंत्री बनवून आपण चूक केली असे नितीशकुमार सांगत आहेत; परंतु त्यांनी चूक नाही तर घोडचूक केली, असे मांझी यांनी म्हटले आहे. ‘मी त्यांच्या हातचे बाहुले बनून वागेन, असे गृहीत धरणे हीच त्यांची घोडचूक होती. गरीब असलो तरी स्वाभिमानी आहे. (वृत्तसंस्था)