देवदर्शनाहून परतणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 12:34 IST2020-03-06T12:33:45+5:302020-03-06T12:34:50+5:30

देवदर्शनावरून परतताना झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

At least 12 people lost their lives after two cars collided in Tumkur SSS | देवदर्शनाहून परतणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

देवदर्शनाहून परतणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

ठळक मुद्दे कर्नाटकच्या कुनिगलजवल एक भीषण अपघात झाला. देवदर्शनावरून परतताना झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू.दोन भरधाव कार एकमेकांना धडकल्याने हा भीषण अपघात झाला.

बंगळुरू - कर्नाटकच्या कुनिगलजवल एक भीषण अपघात झाला. देवदर्शनावरून परतताना झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दोन भरधाव कार एकमेकांना धडकल्याने हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, देवदर्शनाहून परतताना तुमकुरू जिल्ह्यात हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली भाविकांची कार समोरून येणाऱ्या कारला वेगात धडकली. कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती ही चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र बजेट 2020 Live: अर्थमंत्र्यांच्या 'त्या' घोषणेनंतर सगळ्या आमदारांनी वाजवले बाक

'जनाची नाही किमान मनाची तरी...', मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र सीआयडी वेबसाईट हॅक!

एका मिनिटात ४ लाख कोटी स्वाहा; येस बँक, कोरोनामुळे शेअर बाजार गडगडला

China Coronavirus : 'सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा'

 

Web Title: At least 12 people lost their lives after two cars collided in Tumkur SSS