सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:37 IST2025-10-06T13:23:31+5:302025-10-06T13:37:56+5:30
CJI B.R. Gavai: सोमवारी सु्प्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्या न्यायालयात सुनावणीदरम्यान एका व्यक्तीने गोंधळ घातला. त्याने मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर एखादी वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना कोर्टरूममधून बाहेर काढले.

सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
CJI B.R. Gavai:सर्वोच्च न्यायालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्या न्यायालयात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी न्यायालयीन सुनावणीदरम्यान एका व्यक्तीने मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वस्तू फेकण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.
लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली. त्यांना न्यायालयाच्या कक्षातून बाहेर काढले. या घटनेनंतर, न्यायालयीन कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते, परंतु नंतर ते सुरळीतपणे सुरू झाले.
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
संबंधित वकील अचानक व्यासपीठाजवळ गेला आणि खाली वाकून बूट घेऊन न्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वकिलाला ताब्यात घेतले आणि बाहेर काढले.
बाहेर पडताना त्या वकिलाला “सनातन का अपमान नहीं सहेंगे” असे ओरडताना ऐकू आल्याचे साक्षीदारांनी सांगितले.
घटनेदरम्यान सरन्यायाधीश गवई पूर्णपणे शांत राहिले. त्यांनी उपस्थित वकिलांना उद्देशून म्हटले, “या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. आम्ही विचलित नाही. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.”
या घटनेनंतर सुप्रिम कोर्ट परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
These things do not affect me: Chief Justice B R Gavai on man attempting to attack him in Supreme Court
— Press Trust of India (@PTI_News) October 6, 2025