शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

उंबरगे येथे साठवण तलाव खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:16 IST

सोपल यांची उपस्थिती : व्यापारी मित्रमंडळाने दिला एक लाखाचा निधी

सोपल यांची उपस्थिती : व्यापारी मित्रमंडळाने दिला एक लाखाचा निधी
बार्शी : तालुक्यातील उंबरगे येथे लोकसहभागातून सुरूअसलेल्या गावातील साठवण तलावाच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासाठी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी मित्रमंडळाने दिलेल्या निधीतून करण्यात येणार्‍या कामाचा आ़ दिलीप सोपल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला़ यावेळी आमदार सोपल यांच्या हस्ते व्यापारी मित्रमंडळाने दिलेला 1 लाख 101 रुपयांचा धनादेश सरपंच वालचंद मुंढे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
उंबरगे येथे लोकसहभागातून गावातील साठवण तलावाच्या रुंदीकरण, खोलीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य अशोक सावळे, युवा नेते विक्रम सावळे, र्मचंट असो़चे अध्यक्ष तुकाराम माने, बाजार समितीचे संचालक दिलीप गांधी, व्यापारी मित्रमंडळाचे प्रवीण गायकवाड, संतोष बोरोड, अभिजित सोनिग्रा, ल़पा़ चे उपअभियंता एच़टी़ खरात, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अरुण अष्टुळ , सरपंच वालचंद मुंढे, उपसरपंच विलास जाधव, अरुण मुंढे आदी उपस्थित होत़े
आमदार सोपल म्हणाले, गावाने शासन योजनेत सहभाग नसतानादेखील याअंतर्गत सुरू केलेली कामे इतर गावांसाठी आदर्शवत आहेत. व्यापारी मित्रमंडळाला येथील कामांची खात्री पटल्याने त्यांनी सामाजिक भान जपत दिलेली मदत मोलाची असल्याचे गौरवोद्गार काढले. या कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जनकराव जाधव, विक्रम सावळे, अभिजित सोनिग्रा, सरपंच वालचंद मुंढे, चित्रसेन गुळवे आदींची भाषणे झाली.
व्यापारी महासंघाने दिलेल्या निधीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. प्रवीण गायकवाड यांनी व्यापारी महासंघाच्या वतीने यंदा 20 प्राथमिक शाळा दत्तक घेऊन तेथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करणार असल्याचे सांगितले. यावेळी सचिन मडके, प्रशांत कथले, ग्रामविकास अधिकारी एस़बी़ खळदकर, संतोष बोराडे, आप्पा पाटील, अरुण मुंढे, शिवाजी हावळे, अरुण अडसूळ, राहुल मुंढे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गुणवंत विधाते यांनी केले.