हरयाणा-राजस्थान सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 05:35 PM2020-12-31T17:35:22+5:302020-12-31T17:39:11+5:30

Farmers Protest : ३०-४० शेतकरी बॅरिकेट्स तोडणं आणि राज्याच्या संपत्तीचं नुकसान केल्याच्या आरोपाखाली हरयाणा पोलिसांच्या ताब्यात

lathi charge on farmers by haryana police at rajasthan border during protest today updates | हरयाणा-राजस्थान सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून लाठीमार

हरयाणा-राजस्थान सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून लाठीमार

Next
ठळक मुद्दे३०-४० शेतकरी पोलिसांच्या ताब्यातदोन्ही बाजूंच्या चर्चेनंतर शेतकरी नेत्यांचंही शांतता राखण्याचं आंदोलकांना आवाहन

नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत अनेकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्या. राजस्थान आणि हरयाणाच्या सीमेवर असलेल्या शाहजहांपूरमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या श्रीगंगानगरमधून आलेल्या तरूणांनी हरयाणापोलिसांकडून सीमेवर लावलेले बॅरिकेट्स तोडले आणि जबरदस्ती ट्रॅक्टर ट्रॉलिंना हरयाणा सीमेत नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे हरयाणा पोलीस प्रशासन आणि शेतकरी आंदोलक यांच्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. यात अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतली.
 
मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या शांततामय वातावरणात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काही तरुणांनी एकत्र येत एक रणनीती आखली. यानुसार त्यांनी हरयाणाच्या सीमेवर लावण्यात आलेले बॅरिकेट्स तोडून जबरदस्ती अनेक ट्रॅक्टर्स हरयाणा सीमेत नेले. यानंतर हरयाणा पोलिसांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासन आणि हरयाणा सीमेत शिरलेल्या लोकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेनंतर काही वेळ या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला.



राजस्थान आणि हरयाणा पोलीस प्रशासनानं काही वेळानं सर्वांशी चर्चा करून वातावरण शांत केलं. त्यानंतर शेतकरी नेत्यांनीही सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. हरयाणा पोलिसांनी ३०-४० शेतकऱ्यांना बॅरिकेट्स तोडणं आणि राज्याच्या संपत्तीचं नुकसान केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं.

Web Title: lathi charge on farmers by haryana police at rajasthan border during protest today updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.