शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच - नरेंद्र मोदी

By admin | Updated: March 22, 2015 12:52 IST

भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच असून या विधेयकाविरोधात काँग्रेस शेतक-यांमध्ये गैरसमज पसरवत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २२ - भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच असून या विधेयकाविरोधात काँग्रेस शेतक-यांमध्ये  गैरसमज पसरवत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीने ग्रासलेल्या शेतक-यांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासनही मोदींनी दिले आहे. 

रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाद्वारे शेतक-यांशी संवाद साधला. या संपूर्ण कार्यक्रमात मोदींचा भर भूसंपादन विधेयकावर होता. भूसंपादन कायदा १२० वर्ष जून असून जी लोकं आता शेतक-यांचे हितचिंतक म्हणून बोलत आहेत त्या लोकांनीही याच कायद्यानुसार राज्य केले असे सांगत मोदींनी काँग्रेसला चिमटा काढला. भूसंपादनासोबतच भारतात १३ असे कायदे आहेत ज्यात भूमी अधिग्रहण करता येते, यात रेल्वे, खाण व राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे असे मोदींनी निदर्शनास आणून दिले. भूसंपादन कायद्यातील त्रुटी दूर करुन शेतक-यांचे हित साधण्याचा आमचा प्रयत्न आहे  असे मोदींंनी स्पष्ट केले. 

नवीन विधेयकात भूसंपादनात शेतक-यांना चार पट नुकसान भरपाई मिळेल, याशिवाय तिथे औद्योगिक कॉरिडोर झाल्यास गावातील तरुणांना रोजगारही मिळू शकेल, प्रकल्पासाठी जागा देणा-यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळेल असे आश्वासन मोदींनी दिले आहे.