शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन विधेयकावर माघार नाहीच

By admin | Updated: March 20, 2015 01:31 IST

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भूसंपादन विधेयकावर आक्रमक धोरण अवलंबत वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा समेटाचा आणि खुल्या चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे.

नबीन सिन्हा - नवी दिल्लींकाँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भूसंपादन विधेयकावर आक्रमक धोरण अवलंबत वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा समेटाचा आणि खुल्या चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे.गडकरींनी गुरुवारी खुल्या चर्चेचे आव्हान देतानाच समेट घडवून आणण्यासाठी तयारी दर्शविली होती. सोनिया गांधी यांनी अलीकडेच १४ पक्षांची एकजूट घडवत राष्ट्रपती भवनावर ‘निषेध मार्च’ नेला होता. अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुढील आठवड्यात हरियाणा आणि राजस्थानमध्ये रॅली घेण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. भूसंपादन विधेयकातील सुधारणांमुळे शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत सावध करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. भूसंपादन विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि अन्य पक्षांशी वाटाघाटी करण्याची तयारी गडकरी यांनी एका पत्रात दर्शविली होती.त्याला उत्तर देताना काँग्रेसने सरकारला मूळ मुद्यापासून लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न थांबविण्याचा इशारा दिला. योग्य मोबदल्याचा अधिकार विधेयक २०१३ मध्ये सुधारणा करीत वटहुकूम आणण्यामागे मूळ उद्देशाला मूठमाती देण्याचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.संपुआने आणलेल्या विधेयकाला भाजपने समर्थन दिले होते, मग मोदी सरकारने आता वटहुकूम आणण्याचे कारण काय? यावर मोदी व गडकरी या दोघांनीही स्पष्टीकरण द्यावे. देशभर या विधेयकाविरुद्ध आक्रोश सुरू असताना लोकसभेने ते बहुमताच्या बळावर पारित का केले? गडकरींना सरकारचे प्रवक्ते व मध्यस्थ नेमण्यात आले असताना ग्रामीण विकास मंत्री मौन का बाळगून आहेत? असा सवालही काँग्रेसने केला आहे.