मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 19:02 IST2025-11-27T18:43:43+5:302025-11-27T19:02:43+5:30
पोलिसांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाही काही परिणाम झाला नाही. कारण महिला आपल्या निर्णयावर ठाम होती...

मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा
उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पाली येथील ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. येथे एका पाच मुलांच्या आईने पती आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत नवा संसार थाटला आहे. संबंधित महिला गेल्या चार महिन्यांपासून माहेरी राहत होती. जेव्हा पती तिला घेण्यासाठी गेला, तेव्हा तिने परत येण्यास नकार दिला. सुमारे एक महिन्यापूर्वी १५ नोव्हेंबरला ही महिला आपल्या पतीला आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती.
काही दिवस लपून राहिल्यानंतर, ती महिला आपल्या प्रियकरासोबत परत गावात आली आणि उघडपणे एकत्र राहू लागली. यामुळे, पत्नीचा सातत्याने शोध घेत असलेला पाच मुलांचा बाप पार खचला. तो थेट प्रियकराच्या घरी पोहोचला. त्याने पत्नीची प्रचंड समजूत घातली, मुलांच्या शपथा दिल्या. मात्र, महिलेवर काहीच परिणाम झाला नाही. पतीला रिकाम्या हातानेच परतावे लागले.
बाप लहान दुधपिणाऱ्या बाळाला छातीशी लावून आणि इतरांचे बोट धरून घरी परतला. पोलिसांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाही काही परिणाम झाला नाही. कारण महिला आपल्या निर्णयावर ठाम होती. महत्वाचे म्हणजे, तिचा प्रियकर देकील विवाहित असून एका मुलाचा बाप आहे, ज्याची पत्नी दोन वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली आहे.
अजब करार -
प्रचंड समजावून, विनंती करूनही पत्नी राजी झाली नाही. यामुळे अखेर एक विचित्र करार करण्यात आला. या आईने आपल्याच मुलांची वाटणी केली. तिने तीन मुले आपल्याजवळ ठेवली, तर दुधपिणाऱ्या बाळासह दोन मुले पतीला दिली. विशेष म्हणजे, ही सर्व मुले १२ वर्षांपेक्षाही लहान आहेत. प्रेमासाठी पोटच्या मुलांना आई-बापाच्या मायेपासून वंचित करणाऱ्या या महिलेची संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे.