लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक केलेला केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शेतकरी आंदोलन करत असताना, त्यांच्यावर वाहने घालण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले होते. याप्रकरणी उत्तर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने आशिष मिश्रा याची सुमारे १२ तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली. आशिष मिश्राच्या पोलीस रिमांडसाठी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज दाखल झाला असून, त्यावर उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे. लखीमपूर खेरीमध्ये ज्या वाहनांखाली चिरडून शेतकरी ठार झाले, त्यापैकी एका वाहनात आशिष मिश्राही होता असा आरोप आहे.
Lakhimpur Kheri Violence: Ashish Mishraला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, रिमांड अर्जावर आज निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 07:21 IST