शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

सकाळी पोलीसची ड्युटी, संध्याकाळी मास्कचं शिवणकाम; मुख्यमंत्र्यांनीही केला तरुणीला सलाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 7:36 PM

या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. ही महिला पोलीस कर्मचारी लॉकडाऊनमध्ये आपली सेवा पार पाडल्यानंतर घरी येऊन मास्क तयार करते. 

ठळक मुद्देया महिला पोलीस कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात सेवा झाल्यानंतर शिवतात मास्कपोलीस कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांनाही त्या हे तयार केलेले मास्क वाटतात खुद्द मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे

भोपाळ - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सर्वात महत्वाचे शस्त्र म्हणजे मास्क आणि सॅनिटायझर. जगाबरोबरच आपल्या देशातही मास्कचा तुटवडा आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोक घरीच मास्क तयार करून लोकांना वाटत आहेत. अशात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. ही महिला पोलीस कर्मचारी लॉकडाऊनमध्ये आपली सेवा पार पाडल्यानंतर घरी येऊन मास्क तयार करते. 

मध्य प्रदेशातील या महिला पोलीस कर्माचाऱ्याचे कौतुक खुद्द मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही केले आहे. या महिला कर्मचाऱ्याचे कौतुक करताना ‘मुली, नेहमी आनंदी राहा आणि जगाचे कल्याण करत राहा,’ असे शिवराजसिंह यांनी म्हटले आहे.

या महिला पोलीस कर्मचाऱ्याची माहिती संदीप सिंह नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर टाकली आहे. या महिलेचे नाव आहे सृष्टी श्रोतिया. संदीप सिंह यांनी 4 एप्रिलला ट्विटरवर श्रृष्टी यांचा फोटो शेयर अरत, मध्यप्रदेशातील सागरच्या खुरई पोलीस ठाण्याच्या महिला आरक्षक सृष्टि श्रोतिया लॉक डाऊनमध्ये आपले कर्तव्य पार पाडल्यानंतर, घरी जाऊन मास्क तयार करतात. हे मास्क त्या पोलीस ठाण्यातील कर्माचाऱ्यांसह सामान्य लोकांनाही वाटतात. सृष्टी यांना कोटी-कोटी प्रणाम…

संदीप सिंह यांचे हे ट्वीट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी री-ट्वीट केले आहे. ट्विट री-ट्विट करताना शिवराजसिंह यांनी, ‘आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशॄङखला। यया बद्धा: प्राधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत्॥ मुली या सृष्टीचा आधार आहेत आणि यांच्यामुळेच सृष्टी धन्य होते. श्रृष्टि सारख्या मुलींमुळे ही धन्य वारंवार धन्य झाली आहे! ‘मुली, नेहमी आनंदी राहा आणि जगाचे कल्याण करत राहा,’ असे लिहिले आहे. 

हे ट्विट आतापर्यंत अनेकांनी री-ट्विट केले आहे. तर अनेकांनी यावर लाईक आणि कॉमेंट्सदेखील केल्या आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिलाEmployeeकर्मचारीMadhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत