शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

श्रीश्रींच्या संस्कृती महोत्सवामुळे जैव विविधतेची हानी

By admin | Updated: August 18, 2016 05:34 IST

आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या जागतिक संस्कृती महोत्सवामुळे संपूर्ण पूरक्षेत्र उद्ध्वस्त होऊन जैवविविधतेची अपरिमित हानी झाली असून, ती कदाचित कधीही भरून निघू शकणार नाही

नवी दिल्ली : आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या जागतिक संस्कृती महोत्सवामुळे संपूर्ण पूरक्षेत्र उद्ध्वस्त होऊन जैवविविधतेची अपरिमित हानी झाली असून, ती कदाचित कधीही भरून निघू शकणार नाही, असा निष्कर्ष राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने काढला आहे. हा निष्कर्ष प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर आणि आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशन या संस्थेसाठी धक्का मानला जात आहे. आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनने यमुनेच्या काठावर मार्च महिन्यात जागतिक संस्कृती महोत्सव घेतला होता. या महोत्सवामुळे पर्यावरणाची हानी झाली काय याचा अभ्यास करण्यासाठी एनजीटीने जलस्रोत मंत्रालयाचे सचिव शशी शेखर यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना केली होेती. या समितीने आपला अहवाल नुकताच एनजीटीच्या सुपूर्द केला. या अहवालात म्हटले आहे की, कार्यक्रमाचे मुख्य स्थळ म्हणून वापर करण्यात आलेले पूरक्षेत्र (यमुना नदीच्या उजव्या तीरावरील डीएनडी उड्डाणपूल ते बारापुल्ला ड्रेनदरम्यानचा भाग) पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सपाटीकरणासह पूरक्षेत्राची दबाई करण्यात आल्यामुळे जल संचयासाठी जागा उरली नाही. अनेक वनस्पती आणि झाडेझुडपेही नाहीशी होऊन जैवविविधतेचा ऱ्हास झाला आहे. द आर्ट आॅफ लिव्हिंगने हा अहवाल फेटाळला असून, पर्यावरण हानीचे आरोप अवैज्ञानिक, पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. आपण समितीच्या पुनर्स्थापनेची मागणी केली असून, एनजीटीने आपल्या अर्जावर अद्याप सुनावणी केलेली नाही, असेही या संस्थेने म्हटले. एनजीटी याबाबत २८ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी करणार आहे. पर्यावरणीय हानीच्या भरपाईसाठी एनजीटीने गेल्या मार्चमध्ये द आर्ट आॅफ लिव्हिंगला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावून आणखी नुकसान होऊ न देण्याचे शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)आधीच झाला होता वाद३५ लाख लोक सहभागी झालेल्या या महाकार्यक्रमासाठी सात एकरचा मंच उभारण्यात आला होता. तात्पुरत्या बांधकामामुळे जैवविविधतेची अपरिमित हानी होऊ शकेल, असे एनजीटीने म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांनी पाठ फिरवली.