शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

लयभारी! शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज; शेतकऱ्याने पाठवली थेट विमानाची तिकिटे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 9:31 AM

गावी गेलेल्या कामगारांना परत कामावर बोलावणं हे व्यावसायिकांसाठी आव्हान आहे. मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी नानाविध शक्कल लढवली जात आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 30 लाखांवर पोहोचली आहे. तर 50 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला अन् आपलं गाव गाठलं. गावी गेलेल्या कामगारांना परत कामावर बोलावणं हे व्यावसायिकांसाठी आव्हान आहे. मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी नानाविध शक्कल लढवली जात आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

लॉकडाऊनमध्ये घरी गेलेल्या प्रवासी मजुरांची आता कमतरता भासू लागली आहे. दिल्लीच्या शेतकऱ्यांना देखील आता शेतात काम करण्यासाठी मजुरांची आवश्यकता आहे. शेतात काम करायला मजूर नाहीत म्हणून एका शेतकऱ्याने मजुरांना थेट विमानाचं तिकीट पाठवल्याची घटना समोर आली आहे. पप्‍पन सिंह असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. पप्‍पन सिंह यांची मशरुमची शेती आहे. शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज आहे. 

पप्पन यांनी 20 प्रवासी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. हे प्रवासी मजूर बिहारमधील पाटणा विमानतळावरून लवकरच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी रवाना होतील. मिळालेल्या माहितीनुसार, पप्पन सिंह दिल्लीतील तिगिपूर गावचे रहिवासी आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून मशरुमची शेती करतात. कित्येक वर्षांपासून अनेक मजूर त्यांच्या शेतात काम करत आहेत. मात्र लॉकडाऊनमध्ये मजूर बिहारला आपल्या गावी निघून गेले. पप्‍पन सिंह यांनी या सर्व मजुरांसाठी पहिल्यांदा ट्रेनचं तिकीट बूक करण्याचा विचार केला. 

पुढील दीड महिन्यांपर्यंत कोणतीही ट्रेन उपलब्ध नाही. त्यामुळे पप्पन यांनी 20 प्रवासी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधीही काही व्यावसायिकांनी मजुरांना परत बोलवण्यासाठी विमानाची तिकिटे पाठवली आहेत. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांना परत कामावर बोलावण्यासाठी त्यांच्या मालकाने थेट विमानाची तिकिटे बुक केली होती. तिकिटे मजुरांना पाठवण्यात आली. बिल्डरने उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये राहणाऱ्या मजुरांना परत कामावर हजर होण्यासाठी ही सोय केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

फ्लायओव्हरचा भाग कोसळल्याचा व्हायरल फोटो ना मुंबईचा, ना पुण्याचा, ना बंगळुरूचा... जाणून घ्या सत्य 

"...असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही", शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल

"काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार"

"मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय", Video शेअर करत मोदी झाले भावूक

कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचं मंगल करावं, शरद पवारांचं गणरायाला साकडं

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमानFarmerशेतकरीdelhiदिल्लीBiharबिहारagricultureशेती