शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:15 IST

बिहारच्या भागलपूरची ही विवाहबाह्य संबंधांची स्टोरी सगळीकडे चर्चेत आली आहे.  जेव्हा जेव्हा तिने त्याच्यावर दबाव टाकला तेव्हा तेव्हा कुंदन पळून जायचा. 

पतीपासून तीन मुलांना जन्म दिला, नंतर आपल्या वयापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवले. पतीला धोका दिला म्हणून पतीने सोडले. तर गावकऱ्यांनी त्या तरुणाला पकडून तिच्यासोबत लग्न लावून दिले. बिहारच्या भागलपूरची ही विवाहबाह्य संबंधांची स्टोरी सगळीकडे चर्चेत आली आहे. 

खरेतर या तरुणाला म्हणजेच तीन मुलांच्या आईच्या प्रियकराला तिच्यासोबत मौजमस्ती करायची होती. पतीला जेव्हा आपल्या पत्नीचे लफडे असल्याचे समजले तेव्हा त्याने तिला सोडचिठ्ठी दिली. निशाही दिल्लीला राहत होती. तर कुंदन हा भागलपूरला राहत होता. पतीला निशाचे प्रेमसंबंध असल्याचे समजले त्यामुळे त्याने तिला सोडले होते. यामुळे निशा ही कुंदनसोबत भागलपूरला येऊन राहू लागली होती. 

निशाला तीन मुले होती, सर्वात मोठा मुलगा हा १७ वर्षांचा होता. हे दोघे एकत्र राहत होते, कुंदनला जेवण-पाणी सगळे मिळत होते. अशातच निशाने कुंदनवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यामुळे त्रासून त्याने तिला दिल्लीला सोडले आणि परत भागलपूरला आला. काही दिवसांनी निशा पुन्हा भागलपूरला आली, त्याच्यावर दबाव टाकू लागली. जेव्हा जेव्हा तिने त्याच्यावर दबाव टाकला तेव्हा तेव्हा कुंदन पळून जायचा. 

परंतू, बुधवारी रात्री दोघांचे जोरदार भांडण सुरु झाले. कुंदनने तिच्यावर हात उगारला, काही तास हा वाद सुरु होता. यामुळे त्यांना एवढे दिवस असेच राहताना पाहणाऱ्या गावकऱ्यांनी दोघांनाही पकडले आणि मंदिरात नेले. पोलिसांना कळवत दोघांचेही लग्न लावून दिले. यावेळी कुंदन गावकऱ्यांना आपले हिच्याशी लग्न लावू नका, ती तीन मुलांची आई आहे. मी फक्त तिच्यासोबत मजेसाठी राहत होतो. खाणे-पिणे आणि राहणे एवढ्यापुरतेच होते हो, ती माझ्यापेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे हो, असे सांगत होता. परंतू, गावकऱ्यांनी त्याचे काही ऐकले नाही आणि लग्न लावून दिले आहे. 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्न