"वर होतं, 25 लाख वर्षे जुन्या हिमालयातून काढलेलं मीठ अन् खाली..."; कुमार विश्वास रामदेवांवरच घसरले, लोक भडकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:43 IST2024-12-24T15:40:59+5:302024-12-24T15:43:42+5:30

kumar Vishwas : या व्हिडिओमधील कुमार विश्वास यांच्या बाबा रामदेव यांच्यासंदर्भातील भाष्यावर, लोकांनीही संताप व्यक्त केला आहे. स्वदेशीला पुढे नेण्यात योगगुरूंची महत्त्वाची भूमिका असल्याची आठवणही त्यांनी कुमार विश्वास यांन करून दिली आहे...

kumar vishwas commented about baba ramdev company salt people reacted | "वर होतं, 25 लाख वर्षे जुन्या हिमालयातून काढलेलं मीठ अन् खाली..."; कुमार विश्वास रामदेवांवरच घसरले, लोक भडकले!

"वर होतं, 25 लाख वर्षे जुन्या हिमालयातून काढलेलं मीठ अन् खाली..."; कुमार विश्वास रामदेवांवरच घसरले, लोक भडकले!


 कुमार विश्वास यांचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कुमार विश्वास यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यासंदर्भात भाष्य केले आहे. स्ट्रीट्स ऑफ मेरठच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमधील कुमार विश्वास यांच्या बाबा रामदेव यांच्यासंदर्भातील भाष्यावर, लोकांनीही संताप व्यक्त केला आहे. स्वदेशीला पुढे नेण्यात योगगुरूंची महत्त्वाची भूमिका असल्याची आठवणही त्यांनी कुमार विश्वास यांन करून दिली आहे. याशिवाय, अनेकांनी कुमार विश्वास यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असेही म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये कुमार विश्वास बाबा रामदेव यांचे नाव न घेता म्हणत आहेत की, "मी नवरात्रीच्या काळात त्यांचे मीठ विकत घेतले होते. ते त्यांचे उत्पादन अशा प्रकारे विकतात की, विकत  घेतले नाही, तर त्याच दिवशी सनातन धर्माचा राजीनामा. त्या मीठावर असा मेसेज लिहिला होता की इस्लामुद्दीनही ते विकत घेईल. त्यावर लिहिले होते, '25 लाख वर्षे जुन्या हिमालयातून काढलेले मीठ'.

कुमार विश्वास एवढ्यावरच थांबले नाही, ते पुडे म्हणाले, "आदमी भावुक होतो. तो चित्र बनवू लागतो की, बाबा धोतर वर करून कसे चढले असतील. कसे फावड्याने मीठ काढले असेल? बाळकृष्णजी टोपली घेऊन मागे उभे असतील. खाली तर  आणखीनच कमालीची ओळ लिहिलेली होती. खाली लिहिले होते, 'एक्सपायरी डेट 7 फेब्रुवारी'. बाबांनी ते नेमके वेळेवर बाहेर काढले असे दिसते, नाहीतर तिथेच पडून राहून सडले असते. असे वाटते की, बाबांनी अगदी वेळवर काढून आणले अन्यथा पडून पडून सडून गेले असते."


या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे, "आपण रामदेव बाबांऐवजी गुटखा प्रमोशनवर बोलला असतात, तर बरे झाले असते. आणखी एकाने म्हटले आहे की, आपण भारतीय याच पद्धतीने आपल्याच लोकांवर जळतो. कुलवेंद्र सिंह शेखावत नावाच्या एका युजरने म्हटले आहे. याशिवाय काही युजर्सनी कुमार विश्वास यांच्या निर्भयतेबद्दल त्यांचे कौतुकही केले आहे.

 

Web Title: kumar vishwas commented about baba ramdev company salt people reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.