शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास दिला नकार; पाकचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 14:54 IST

पाकिस्तानी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जाधव यांना १७ जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते, पण जाधव यांनी नकार दिला.

ठळक मुद्देपाकिस्तानने दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर दिली आहे.जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचे माहिती मिळत आहे.कुलभूषण जाधव हे २०१६ पासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. कुलभूषण जाधव हे हेर असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे.

पाकिस्तानच्या तुरुंगात हेरगिरीच्या आरोपाखाली कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल पाकिस्तान सरकारने आता  दावा केला आहे. कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, असा दावा पाक सरकारने केला आहे. तसेच जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर देण्यात आल्याचा देखील पाकिस्तानचा दावा आहे. जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचे माहिती मिळत आहे.पाकिस्तानी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जाधव यांना १७ जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते, पण जाधव यांनी नकार दिला. यासंदर्भात पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांना पत्र लिहिले आहे. पाकिस्तानने दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर दिली आहे.कुलभूषण जाधव हे २०१६ पासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. कुलभूषण जाधव हे हेर असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पण हा दावा भारतानं बर्‍याच वेळा नाकारला आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून कुलभूषण यांना अटक केली. सन २०१७ मध्ये भारतानं आयसीजेकडे हे प्रकरण सोपावलं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोर्टाने पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर अ‍ॅक्सेस देण्याची आणि फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यास सांगितले होते.गेल्या वर्षी भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव आणल्यामुळे पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र त्यावेळी पाकिस्ताननं जाधव यांच्या आई आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली होती. कुलभूषण जाधव यांना भेटण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र काढायला सांगितलं होतं. यानंतर काही दिवसांनी पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला गेला. यामध्ये कुलभूषण स्वत:ला हेर म्हणत होते. मात्र, हा व्हिडीओ पाकिस्तानच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप झाला होता.  

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानIndiaभारतjailतुरुंग