कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेला पुन्हा गळती; लाखो लिटर पाणी वाया * नुकसान भरपाई दिल्याशिवाय गळती काढू देणार नाही; परिसरातील शेतकर्यांची भूमिका
By admin | Updated: May 12, 2014 21:09 IST
इचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करणार्या कृष्णा नळपाणी योजनेतील नळाला शिरढोण-टाकवडे दरम्यान मोठी गळती लागली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाऊन परिसरातील शेतीचेही नुकसान झाले. शेतकर्यांनी नुकसान भरपाई दिल्याशिवाय गळती काढू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने त्याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेला पुन्हा गळती; लाखो लिटर पाणी वाया * नुकसान भरपाई दिल्याशिवाय गळती काढू देणार नाही; परिसरातील शेतकर्यांची भूमिका
इचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करणार्या कृष्णा नळपाणी योजनेतील नळाला शिरढोण-टाकवडे दरम्यान मोठी गळती लागली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाऊन परिसरातील शेतीचेही नुकसान झाले. शेतकर्यांनी नुकसान भरपाई दिल्याशिवाय गळती काढू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने त्याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याने इचलकरंजीला पिण्यासाठी कृष्णा नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेला वारंवार गळती लागते. त्यामुळे पालिकेने काही परिसरात नवीन जलवाहिनी टाकली आहे. मात्र, आज (सोमवार) या नव्याच जलवाहिनीला वडगे यंत्रमाग कारखान्याजवळ मोठी गळती लागली. यामधून लाखो लिटर पाणी परिसरातील मशागत पूर्ण झालेल्या व पेरणी झालेल्या शेतीमध्ये पसरले. त्याचबरोबर शेतात असलेल्या विहिरीमध्येही पाणी जाऊन विहिरी भरल्या व पाणी उपसा करण्यासाठी बसविण्यात आलेल्या विद्युत मोटारी बुडाल्या. या कारणांमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वारंवार होणार्या या गळतीमुळे परिसरातील शेतकर्यांच्या शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे नुकसान भरपाई दिल्याशिवाय पालिकेला गळती काढू देणार नाही, अशी भूमिका संजय वडगे, कल्लाप्पा वडगे, शिवाजी काळे, अशोक चौगुले, हरिश्चंद्र काळे यांच्यासह परिसरातील शेतकर्यांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)