शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

Koregaon-Bhima Violence : नव्या भारतात स्वागत, नक्षल समर्थकांच्या अटकेवरून राहुल गांधींचे सरकारवर टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 12:49 PM

Koregaon-Bhima Violence : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएस आणि भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

नवी दिल्ली - पुणे पोलिसांनी मंगळवारी कोरेगाव-भीमा हिंसाचारासंबंधी देशातील वेगवेगळ्या शहरात छापेमारी केली. या कारवाईदरम्यान बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. 

''देशात केवळ एकाच स्वयंसेवी संस्थेसाठी स्थान आहे आणि ती संस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय. अन्य सर्व स्वयंसेवी संस्था बंद करण्यात याव्यात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कारागृहात डांबावं आणि तक्रारी करणाऱ्यांना गोळ्या झाडाव्यात. नवीन भारतात आपलं स्वागत आहे'', असे ट्विट करत राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. 

नेमके काय आहे प्रकरण?31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर कोरेगाव-भीमा हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचारात एकाचा मृत्यूदेखील झाला होता. या हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं छापेमारी करत हैदराबाद, मुंबई, ठाणे, नवी दिल्ली, रांची येथे छापे घातले. कवी वारा वारा राव (हैदराबाद), इकॉनॉमकि अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (नवी दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई), अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली आहे.  

(Koregaon-Bhima Violence : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटाचा पत्रात उल्लेख?, माओवादी 'थिंक टँक'ला अटक)

दुसरीकडे, 2018 वर्षांच्या सुरुवातीस पुणे पोलिसांनी कथित स्वरुपात माओवादी नेत्याकडून लिहिण्यात आलेले पत्र जप्त केले होते. या पत्रामध्ये देशात वेगवेगळ्या ठिकाणी घडवून आणण्यात आलेल्या नक्षलवादीकारवायांसाठी कवी वारा वारा राव यांनी कथित स्वरुपात केलेल्या मार्गदर्शनाप्रती त्यांचे कौतुक करण्यात आले होते. कॉम्रेड मिलिंद यांनी लिहिलेल्या पत्रात राव यांचे कौतुक करत ‘वरिष्ठ कॉम्रेड’ असा उल्लेख करण्यात आला आहे. 

या पत्रात असे म्हटले गेले आहे की, 'गेल्या काही महिन्यांमधील विविध उपक्रमांमध्ये वरिष्ठ कॉम्रेड वारा वारा राव आणि आपले कायदेशीर सल्लागार कॉम्रेड वकील सुरेंद्र गाडलिंग यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आपला राष्ट्रीय स्तरावर चांगला प्रचार झाला आहे'

पत्रात नेमके आहे तरी काय?जून 2018 मध्ये माओवाद्यांशीसंबंधीत असलेले एक पत्र समोर आले होते. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजीव गांधी यांच्याप्रमाणे हत्या करण्याच्या कटाची माहिती उघड झाली होती. 18 एप्रिलला कॉम्रेड प्रकाश यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले गेले आहे की, ''हिंदू फॅसिझमला हरवणं आता आवश्यक झाले आहे. मोदींच्या नेतृत्वात हिंदू फॅसिस्ट पुढे जात आहेत, त्यांना वेळीच थांबवणं गरजेचं आहे. मोदींच्या नेतृत्वात भाजपाची 15 राज्यांमध्ये सत्ता आहे. हे अशाच पद्धतीनं सुरू राहिले तर धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे राजीव गांधी हत्याकांडप्रमाणे घटना घडवावी, असा विचार सुरू आहे. जर असे झाल्यास, हा एक सुसाईड अटॅक वाटू शकतो. आपल्याकडे ही एक संधी आहे, असे आम्हाला वाटते. मोदींच्या रोड शोला टार्गेट करणं एक चांगले नियोजन होऊ शकते''. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारRahul Gandhiराहुल गांधीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnaxaliteनक्षलवादी