Koregaon Bhima: गौतम नवलखांच्या अटकेची परवानगी द्या, पुणे पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 14:29 IST2018-12-03T14:24:09+5:302018-12-03T14:29:41+5:30
उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल करुन इतर आरोपींप्रमाणेच गौमत नवलखा यांनाही अटक करण्याची परवानगी देण्यात यावी.

Koregaon Bhima: गौतम नवलखांच्या अटकेची परवानगी द्या, पुणे पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र
नवी दिल्ली - भीमा-कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी संशयित आरोपी गौतम नवलखा यांना अटक करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर करुन मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या अटकेची मागणी केली आहे. याप्रकरणातील इतर आरोपींशी गौतम यांचा जवळून संबंध असल्याचे पुरावे हाती लागल्याचे पोलिसांनी या शपथपत्रात म्हटले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गोंधळ घालणे आज फॅशन बनली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल करुन इतर आरोपींप्रमाणेच गौमत नवलखा यांनाही अटक करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे पुणे पोलिसांनी केली आहे. गौतम नवलखावर ठेवण्यात आलेले गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे गौतम यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने गौतम नवलखा यांना 1 नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी नवलखा यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी एका याचिकेद्वारे केली आहे. मात्र, सरकारी वकिल अरुणा पाई यांनी नवलखा आणि तेलतुंबडे यांविरुद्ध न्यायालयात बाजू मांडली. पोलिसांकडे यांसह इतरही आरोपींविरुद्ध प्रबळ पुरावे आहेत. दरम्यान, नवलखा यांच्या वकिलांनाही बाजू मांडताना हे आरोप तथ्यहीन असून नवलखा हे समाजकार्य करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे.