शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'राहुल गांधी भारतविरोधी शक्तींशी जोडलेले आहेत', एपस्टीनचे नाव घेत किरेन रिजिजूंचा कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:33 IST

Kiren Rijiju on Rahul Gandhi: 'अर्थसंकल्पीय अधिवेशनातील गोंधळासाठी राहुल गांधी जबाबदार'

Kiren Rijiju on Rahul Gandhi: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या गोंधळ, अविश्वास प्रस्ताव आणि विरोधकांच्या भूमिकेवरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीव, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी थेट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. संसदेतील गोंधळासाठी राहुल गांधीच जबाबदार असल्याचा आरोप करत, रिजिजूंनी त्यांचे वर्तन “गैरजबाबदार” असल्याचे म्हटले.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

‘भारताच्या सुरक्षेसाठी सर्वात धोकादायक व्यक्ती’

वृत्तसंस्था ANI ला दिलेल्या मुलाखतीत किरेन रिजिजू म्हणाले, राहुल गांधी भारतविरोधी शक्तींशी संलग्न आहेत. ते देश-विदेशातील नक्षलवादी, कट्टरतावादी विचारवंत आणि जॉर्ज सोरोससारख्या व्यक्तींशी भेटतात. विरोधी पक्षनेता संपूर्ण विरोधकांचे प्रतिनिधित्व करतो; मात्र सभागृहाबाहेर जाऊन लोकांना गद्दार ठरवणे, नाट्यमय आंदोलणे करणे आणि अप्रकाशित पुस्तक वाचण्यावर आग्रह धरणे, हे सर्व बालिश वर्तन आहे. संसदीय इतिहासात असा विरोधी पक्षनेता कधी पाहिला नाही. त्यांचे संबंध नेहमी देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांशी असतात. येत्या काळात योग्य ती कारवाई करण्यात येईल.

एपस्टीन फाइल्सवरून राहुल गांधींना प्रत्युत्तर

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाइल्सशी जोडल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना रिजिजू म्हणाले, राहुल गांधींचे समर्थकही हे गंभीरपणे घेत नाहीत, कारण ते कोणताही पुरावा न देता आरोप करतात. पंतप्रधानांनी कुणाला भेटले असल्याचा किंवा कोणतेही दस्तऐवज असल्याचा पुरावा असल्यास तो सादर करावा. निराधार आरोप केल्याने केवळ निराशा आणि हताशा वाढते.

संसदीय गोंधळावर भाष्य

संसदेतील गोंधळाबाबत बोलताना रिजिजू यांनी मान्य केले की, संसदीय लोकशाहीत गोंधळ, गदारोळ होतोच. मात्र, गोंधळादरम्यान संसदेत होणारे प्रत्यक्ष कामही पाहायला हवे. आम्ही विरोधात असताना अध्यक्षांवर कधीही कागद फेकले नाहीत, सत्ताधाऱ्यांच्या बाकांमध्ये बॅनर नेले नाहीत. आजचा विरोधक इतका असंयमित का झाला आहे, याची मला चिंता वाटते. पूर्वी काँग्रेसमध्ये परिपक्व नेते होते. आज मात्र संपूर्ण पक्ष राहुल गांधींसारखा झाला आहे. त्यांच्या भोवतालचे लोकही त्यांच्यासारखेच झाले आहेत, अशी टीका रिजिजूंनी केली. 

अविश्वास प्रस्तावावरून राजकीय तापमान वाढणार...

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावावर रिजिजू यांनी बिर्लांची प्रशंसा केली. अध्यक्षांचे काम सभागृह चालवणे, सरकारची कामे पुढे नेणे आणि विरोधकांना बोलण्याची संधी देणे आहे. विरोधक त्यांच्याच कक्षात घुसून निदर्शने करत असतानाही ओम बिर्ला यांनी संयम दाखवला. सोमनाथ चटर्जी यांच्यासारखे अध्यक्ष असते, तर कदाचित सर्वांना निलंबित केले असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Rijiju Accuses Rahul Gandhi of Anti-India Links, Warns Action

Web Summary : Kiren Rijiju accuses Rahul Gandhi of associating with anti-India forces and engaging in irresponsible behavior. He criticized Gandhi's remarks on Epstein files, deeming them baseless and warned of potential future action against him.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2026Narendra Modiनरेंद्र मोदी