शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 1:58 PM

अनुजितचे हृदय थ्रिप्पुनिथुरा येथील रहिवासी असलेल्या सनी थॉमस (५५) यांना दान करण्यात आले.

ठळक मुद्देराज्य सरकारद्वारे भाड्याने घेतलेल्या पवन हंस एएस 35 डॉफिन हेलिकॉप्टरने मंगळवारी एर्नाकुलमच्या हयात हॉटेलमधून अनुजितचे अवयव एकत्रित करण्याचे अभियान राबवले.

तिरुअनंतपुरम : अवयवदान केल्यास अनेकांना जीवदान मिळू शकते. केरळमध्ये १७ जुलैला ब्रेन डेड घोषित केलेल्या २७ वर्षीय अनुजितची पत्नी प्रिन्सी आणि बहीण अजल्या यांनी अनुजितच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवयवांचे दान केल्यामुळे आठ लोकांसाठी तो फरिश्ता बनला आहे.

केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील कोट्टारकाराजवळ १४ जुलै रोजी अनुजितचा दुचाकीच्या धडकेत अपघात झाला. त्यावेळी त्याला गंभीर अवस्थेत कोतकारा तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. यानंतर केरळ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे दोन एपनियाच्या चाचण्यांद्वारे त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.

अनुजितला ब्रेन डेड घोषित करण्यात आल्यानंतर त्याची पत्नी प्रिन्सी आणि बहीण अजल्या यांनी आठ जणांचे प्राण वाचवण्यासाठी त्याचे हृदय, मूत्रपिंड, डोळे, लहान आतडे आणि हात दान करण्यासाठी पुढाकार घेतला. आरोग्यमंत्री केके शैलजा यांनी दु: खाच्यावेळी हे मानवतावादी पाऊल उचलल्याबद्दल अनुजितच्या कुटुंबीयांचे कौतुक केले. तसेच, मंत्र्यांनी अनुजित यांच्या कुटुंबीयांबद्दलही संवेदना व्यक्त केल्या.

राज्य सरकारच्या केरळ शेअरिंग ऑर्गनायझेशन (केएनओएस) साठी 'मृतासंजीवनी' च्या माध्यमातून अवयवदान करण्यात आले. अनुजितचे हृदय थ्रिप्पुनिथुरा येथील रहिवासी असलेल्या सनी थॉमस (५५) यांना दान करण्यात आले. ते कोची येथील लिसी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, राज्य सरकारद्वारे भाड्याने घेतलेल्या पवन हंस एएस 35 डॉफिन हेलिकॉप्टरने मंगळवारी एर्नाकुलमच्या हयात हॉटेलमधून अनुजितचे अवयव एकत्रित करण्याचे अभियान राबवले.

२०१० मध्ये अनुजितच्या सतर्कतेमुळे संभाव्य रेल्वे अपघात होण्यापासून बचाव झाला होता. त्यावेळी रेल्वे रुळावरील लोको पायलटला सतर्क करण्यासाठी अनुजित आणि त्याच्या मित्रांनी लाल बास्केट फिरवली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवले होते.

अनुजितने एका खासगी उद्योगात ड्रायव्हर म्हणून काम केले आणि नंतर लॉकडाऊननंतर कोटाराकरा येथील सुपरमार्केटमध्ये सेल्समन म्हणून काम केले. त्याला तीन वर्षाचा मुलगा आहे. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरी नेण्यात येईल.

आणखी बातम्या...

नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक, ट्रॅकवर उतरून गोंधळ

चीनविरोधात जागतिक आघाडी, अमेरिकेने घेतली अशी भूमिका    

"मी म्हणजे ट्रम्प नाही..." उद्धव ठाकरेंच्या अनलॉक मुलाखतीचा प्रोमो रिलीज    

"बंदीचे कठोर पालन करा, अन्यथा....", मोदी सरकारचा चिनी अ‍ॅप्स कंपन्यांना इशारा

Oxford नंतर चीनची लस होतेय यशस्वी, कोरोनाशी लढण्याची वाढवते ताकद...

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...   

टॅग्स :KeralaकेरळOrgan donationअवयव दानhospitalहॉस्पिटलJara hatkeजरा हटके