शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
4
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
5
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
6
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
7
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
8
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
9
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
10
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
11
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
12
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
13
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
14
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
15
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
16
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
17
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
18
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
19
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

केरळमध्ये संघर्ष आणखी तीव्र, असहमती दर्शवून राज्यपालांनी केला सीएएविरोधाचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 05:33 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील ठरावाच्या मुद्यावरून राज्यपालांनी केरळ सरकारला याआधीही धारेवर धरले होते.

तिरुवनंतपुरम : केरळमधील डाव्या आघाडी सरकारच्या धोरणांचे प्रतिबिंब उमटलेले अभिभाषण करीत असताना त्यातील नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी ठरावाबद्दलचे संदर्भही राज्यपाल मोहम्मद अरीफ खान यांनी वाचून दाखविले. मात्र, त्याआधी या उल्लेखांशी आपण सहमत नसल्याचेही खान यांनी आवर्जून सांगितले.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील ठरावाच्या मुद्यावरून राज्यपालांनी केरळ सरकारला याआधीही धारेवर धरले होते. राज्यपालांना न कळविता केरळ सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याबद्दल मोहम्मद अरीफ खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. केरळ विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिभाषण करताना राज्यपाल म्हणाले की, सीएएबाबत केरळ सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल माझे काही आक्षेप असले तरी मी अभिभाषणातील परिच्छेद क्रमांक १८ तील मजकूर वाचावा, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात केरळ विधानसभेत संमत झालेल्या ठरावाबाबत या परिच्छेदात उल्लेख आहेत. मात्र, ते धोरणविषयक परिभाषेत बसत नाहीत, असे माझे स्पष्ट मत आहे. राज्यपालांनी वाचलेल्या या परिच्छेदात म्हटले होते की, याआधी धार्मिक आधारावर कधीही नागरिकत्व दिले जात नव्हते. त्यामुळे तशा तरतुदीचा केलेला कायदा हा राज्यघटनेच्या व सेक्युलर विचारांच्या विरोधातील पाऊल आहे. म्हणूनच हा कायदा रद्द करावा, अशी केंद्राला विनंती करणारा ठराव केरळ विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे. (वृत्तसंस्था)मोहम्मद अरीफ खान यांची वाट रोखलीकेरळचे राज्यपाल मोहम्मद अरीफ खान हे अभिभाषणासाठी विधानसभेत बुधवारी आले असता सत्ताधारी काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडीच्या आमदारांनी सुमारे दहा मिनिटे त्यांची वाट रोखून धरली. यावेळी आमदारांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात तसेच ‘राज्यपाल परत जा’ अशा घोषणा दिल्या.सरतेशेवटी विधानसभेतील मार्शल्सनी या आमदारांना दूर सारून राज्यपालांना वाट मोकळी करून दिली.राज्यपालांनी सभागृहात अभिभाषण सुरू केल्यानंतर यूडीएफच्या आमदारांनी वेलमध्ये जमा होऊन पुन्हा राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर या आमदारांनी सभात्याग केला.

टॅग्स :Keralaकेरळcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक