शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

आमदार अपात्र ठरल्यास केजरीवालच दोषी

By admin | Updated: September 11, 2016 07:00 IST

विधिमंडळ सचिवपदी नियुक्त केलेल्या २१ पक्ष आमदारांना अपात्र ठरविण्यात आल्यास, त्याला तुम्हीच जबाबदार असाल

नवी दिल्ली : विधिमंडळ सचिवपदी नियुक्त केलेल्या २१ पक्ष आमदारांना अपात्र ठरविण्यात आल्यास, त्याला तुम्हीच जबाबदार असाल, असे पत्र आम आदमी पार्टीचे बंडखोर आमदार देवेंद्र सेहरावत यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठविले आहे. सेहरावत यांच्या पत्राने पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा दिसून आले. मंत्र्यांवर बलात्कारासारखे आरोप झाल्यामुळे पक्ष अडचणीत असताना सहरावत यांनी केजरीवालांवर लेटर बॉम्ब टाकल्याने खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांनी आशिष तलवारसारख्या सल्लागाराचे ऐकून पक्षाच्या आमदारांची विधीमंडळ सचिवपदी नियुक्ती केली. लाभाची दोन पदे भुषविता येत नाहीत याची आपच्या नवख्या आमदारांना कल्पना नव्हती. आपच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. हे तुमच्यामुळेच घडले आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.पक्षाच्या पंजाब शाखेच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी महिलांचे शोषण केल्याचा आरोप सेहरावत यांनी केला होता. त्यानंतर आपच्या पंजाब प्रदेश शाखेने त्यांच्यावर अबु्रनुकसानीचा दावा केला होता. तेव्हापासून सहरावत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करीत आहेत. आप सरकारने २१ आमदारांची विधीमंडळ सचिव म्हणून केलेली नियुक्ती उच्च न्यायालयाने आठ सप्टेंबर रोजी बेकायदा ठरविली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)