शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

ुवृत्तपत्रातील जाहिरातीबाबत केजरीवाल यांची भाजपावर टीका

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीकरिता भाजपावर टीका केली आहे. या जाहिरातीत अण्णा हजारे यांच्या व्यंगचित्रावर पुष्पमाला घातल्याचे दाखविले गेले आहे.

नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीकरिता भाजपावर टीका केली आहे. या जाहिरातीत अण्णा हजारे यांच्या व्यंगचित्रावर पुष्पमाला घातल्याचे दाखविले गेले आहे.
सोशल नेटवर्किंग साईट टिष्ट्वटरवर केजरीवाल यांनी, आजच्या दिवशी १९४८ मध्ये नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली होती व आज या जाहिरातीद्वारे अण्णा हजारे यांची हत्या करण्यात आली असे म्हटले आहे. याकरिता भाजपाने माफी मागायला नको काय असा प्रश्नही विचारला आहे. या जाहिरातीत केजरीवालांचेही व्यंगचित्र काढण्यात आले आहे. त्यात ते काँग्रेसकडून समर्थन न घेण्याचे आश्वासन देताना व पुढे त्यांना काँग्रेससोबत युती करताना दाखविले आहेत.
अन्य एका नोंदीत त्यांनी, आपल्या समर्थकांना सचेत राहण्याचे आवाहन केले आहे. वाईट प्रवृत्ती तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील मात्र दिल्लीकरिता सकारात्मक बाबींवरच लक्ष केंद्रीत असू द्यावे असे त्यात म्हटले आहे.
अन्य एका नोंदीत, आप दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे व दिल्लीची सेवा करण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. अण्णा हजारे यांच्या प्रकृतीला आराम पडो असेही त्यात नमूद आहे. केजरीवाल यांचे टिष्ट्वटरवर ३३ लाख वाचक आहेत.