शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर - बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवादी हल्ला, ३ जवान शहीद

By admin | Updated: August 17, 2016 09:14 IST

बुधवारी पहाटे बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला असून २ जवान व एक पोलिस अधिकारी शहीद झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत

जम्मू, दि. १७ - अवघ्या दोन दिवसांपूर्वी , भारताच्या स्वातंत्र्यदिनी श्रीनगर मधल्या नौहट्टामध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे  कमांडर प्रमोद कुमार शहीद झाले. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पहाटे बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला असून त्यामध्ये २ जवान व एक पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत. 
काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील ख्वाजा बाग परिसरातून लष्कराचा ताफा जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ल्या चढवल्याची माहिती मिळाली. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे समजते.  जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी हा संपूर्ण परिसर रिकामा केला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. 
या हल्ल्यात २ जवान व एक पोलीस शहीद झाले असून आणखी चार जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या अशांत परिस्थितीचा फायदा घेऊन गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत.