घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:32 IST2025-09-09T17:31:29+5:302025-09-09T17:32:08+5:30
कविताचं २४ सप्टेंबर रोजी लग्न होणार होतं आणि तिला तिच्या होणार्या पतीसोबत फोटोशूटसाठी जायचं होतं, पण नशिबाने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं.

फोटो - tv9hindi
कर्नाटकातील शिवमोग्गा येथे एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला. कविता असं २६ वर्षीय तरुणीचं नाव असून या महिन्यात तिचं लग्न होणार होती. शिवमोग्गा येथील डुममल्ली क्रॉस येथील साखर कारखान्याजवळ हा अपघात झाला. कविता तिच्या भावासोबत एका खासगी सर्जिकल हॉस्पिटलमधील आपल्या कामावरून परतत होती.
डुममल्ली क्रॉस येथील साखर कारखान्याजवळ एक टीव्हीएस बाईकने कविताच्या बाईकला धडक दिली. यामुळे कविताचा भाऊ संतोष, जो बाईक चालवत होता, त्याचा तोल गेला. नंतर तो बाईकसह फूटपाथवर पडला. कविता रस्त्यावर पडली. त्याच वेळी मागून येणाऱ्या एका सिटी बसने कविताला चिरडलं. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
कविताचा भाऊ संतोष या अपघातात किरकोळ जखमी झाला. सोमवारी ही घटना घडली. कविता एका खासगी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करत होती. सोमवार हा कविताचा हॉस्पिटलमधील शेवटचा दिवस होता. तिने नोकरीचा राजीनामा दिला होता. कविताचं २४ सप्टेंबर रोजी लग्न होणार होतं आणि तिला तिच्या होणार्या पतीसोबत फोटोशूटसाठी जायचं होतं, पण नशिबाने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं.
कविताने आपल्या लग्नाबाबत खूप स्वप्न पाहिली होती. अपघाताची माहिती मिळताच भाजपा आमदार आणि रुग्णालयाचे मालक डॉ. धनंजय सरजी यांनी शोक व्यक्त केला. भाजपा आमदारांनी कविताच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. कविताच्या घरी आनंदाचं वातावरण होतं. कुटुंबीय लग्नाची जोरदार तयारी करत होते. पण या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.